पोम्भूर्णा : काबाडकष्ट, घरकाम व शेतमजुरी हेच आपले जीवन असे समजणाèया आदिवासी गावातील महालक्ष्मी स्वयंसहाय्यता समूहाने वेगवेगळे व्यवसाय आणि उपक्रम राबवून समुहाची मालमत्ता १७ लाखापर्यंत नेली आहे.
तालुक्यापासून अवघ्या ७ कि.मी अंतरावर चेक आस्टा हे आदिवासीबहुल गाव असून, या गावांत शिक्षणाचे प्रमाण अत्यंत अल्प आहे. मागासलेपणा व अंधश्रद्धा यामध्ये हा गाव गुरङ्कटलेला होता. पण ही ओळख पुसून हे गाव एक प्रगतशील गाव म्हणून उदयास येत आहे. यामध्ये मोठा वाटा उमेद अभियानाचा आहे.
उमेद अभियानाअंतर्गत स्थापन झालेल्या महालक्ष्मी स्वयंसहाय्यता समूहाची ही यशोगाथा आहे. सन २०१६ मध्ये अभियानाचा गाव प्रवेश झाला. वर्धिनी अभियानाला कुटुंबे जोडण्यासाठी अभियानाचे महत्त्व पटवून देत होत्या परंतु गावातील महिला समूह तयार करण्यास तयार नव्हत्या. परंतु १५ दिवसांच्या ङ्केरीमध्ये गावात ६ समूह तयार झालेत. यामध्ये महालक्ष्मी स्वयंसहायता समूहाचा सहभाग होता. गावात निवडलेल्या समुदाय संसाधन व्यक्ती यांच्या माध्यमातून हा समूह वाटचाल करू लागला. या समूहामध्ये एकूण१० महिलांचा समावेश असून, त्यामध्ये एक परितक्या महिलेचा सहभाग आहे.
गावात काम करीत असलेली समुदाय संसाधन व्यक्ती यांनी काही कारणास्तव पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे नवीन निवडीचा प्रश्न उपस्थित झाला. कोणतीही महिला काम करण्यास इच्छुक नव्हती. अशावेळेस महालक्ष्मी स्वयंसहाय्यता समूहातील सदस्य श्रीमती सरिता येलके या qहमतीने समोर आल्या. त्यांनी अभियान गावामध्ये रुजविण्याचा प्रयत्न केला. आज या समूहाकडे जवळपास १७ लाख रुपये किमतीची मालमत्ता आहे.समूह इतक्या प्रगतीकडे घेऊन जाण्याकरिता श्रीमती सरिता येलके यांचा वाटा मोलाचा आहे. श्रीमती सरिता येलके यांचा विवाह सन २००२ मध्ये झाला. परंतु २ वर्षानंतर त्या पतीपासून विभक्त झाल्या. तेव्हा आपल्या १ वर्षाच्या मुलाला घेऊन आई वडिलांकडे राहायला आली. शेतीची कामे करावी लागत होती.१० वी पर्यंतच शिक्षण झालेले असून, हाताला काम नव्हते. परंतु अभियानाच्या माध्यमातून तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. अभियानाच्या माध्यमातून ती व तिचा समूह विकासाच्या वाटेवर जाऊ लागला.
तिने स्वत: सन २०१७ मध्ये २० हजार रक्कम घेऊन स्वत:चा किराणा दुकान व्यवसाय सुरू केला. त्याचबरोबर शिवणकामास सुरुवात केली. महिन्याकाठी ५ ते ७ हजार रुपये कमवू लागली. स्वत:च्या प्रगती बरोबरच समुहातील इतर महिलांची प्रगती व्हावी हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून सन २०१९ मध्ये मत्स्यपालन करण्याचे नियोजन करून पंचायत समितीमधून लिलावामध्ये एक तलाव तीन वर्षाकरिता ठेका पद्धतीने घेतला. त्यामध्ये जवळपास २० हजार रुपयांची बोटुकली मासे सोडण्यात आले.
समूहामाङ्र्कत घेण्यात आलेल्या मत्स्य तलावात कामे करताना महिलांनी पुन्हा समुहामाङ्र्कत १५ लाख रुपये किमतीची अवजार बँकेसाठी प्रस्ताव सादर केला. १० टक्के लाभार्थी हिस्सा भरून डिसेंबर २०१९ मध्ये अवजार बँक मंजूर झाली. त्यानंतर थ्रेशर मशिनद्वारे धान पिकाची मळणीसाठी वापर करण्यात आला. यातून समूहाला निव्वळ १ लाख ५० हजार रुपयाचा नङ्का झाला.
लेखन व संकलन
श्री. राजेश एम. दुधे
तालुका अभियान व्यवस्थापक
तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पोम्भूर्णा