नागभिड
: येथील तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाच्या वतीने पाहर्णी येथे गौण वनोपज संकलन
केंद्र सुरू करण्यात आले.
सदर गौण
वनउपज संकलन केंद्र स्त्री शक्ती महिला ग्राम संघ पाहर्णी यांच्या माध्यमातून सुरू
करण्यात आले आहे. यासंबंधात दिनांक
१६/०४/२०१९ रोजी पाहर्णी येथे
ग्रामसंघाची बैठक घेण्यात आली. सदर
बैठकीमध्ये मोह संकलनामार्फत किती मोह खरेदी झाली, अजून काय किती होणार
याविषयी चर्चा करण्यात आली. मोह संकलन करुन त्यावर प्रक्रिया करून मोहाचे तेल,
मोहाचे
लोणचे, मोहाचा ज्यूस तयार करून विकण्याची तयारी आदींवर चर्चा
करण्यात आली. ग्रामसंघाने दिनांक ३१/०३/२०१९ पासून ५०० किलो मोह खरेदी केलेला आहे.
यावेळी ग्रामसंघाचे अध्यक्ष,सचिव, कोषाध्यक्ष,सर्व सभासद, तालुका अभियान व्यवस्थापक, प्रभाग समन्वयक,
समुदाय
कृषी व्यवस्थापक उपस्थित होते.