अर्पणा
विलास चरडे
स्त्री
शक्ती महिला स्वयंसहायता समुह
वायगाव
भोयर, ता. वरोरा
मी
अर्पणा विलास चरडे, मु. पो. वायगाव भोयर, ता. वरोरा, जि.
चंद्रपूर. मी स्त्री शक्ती महिला स्वंयसहायता समुहात २०१५ पासून सदस्य आहे.
स्वयंसहायता समुहातून माझ्या छोटया मोठया गरजा भागविल्या जात असतानाच मला एक
कल्पना सुचली. एका ठिकाणी मला मशरूम लागवडीची कल्पना
सुचली. ही कल्पना मी गटासमोर मांडली. या कल्पनेस समुहाने पाठींबा दिला. मी दि. १
एप्रिल २०१८ रोजी ४० हजार रू. भांडवलासह आराध्या मशरूम उद्योग
केंद्र हा व्यवसाय सुरू केला. त्याकरिता मी स्वतः विविध ठिकाणांवरून माहीती घेतली
व कार्यशाळांना उपस्थित राहिले. सदयस्थितीला माझ्या मशरूम व्यवसायाचे
स्वरूप छोट्या स्वरूपात आहे. पण हा व्यवसाय सुरू करण्यासाठी ङ्कक्त ४० हजार रुपये
भांडवल लागले. मला यातून ६० हजार रुपये उत्पन्न झाले. या व्यवसायातून झालेल्या
नफ्यातून मी माझ्या इतर आर्थिक गरजा भागवू शकते. मला या व्यवसायात पुढे जायचे आहे
व हा व्यवसाय वाढवण्याची माझी प्रबळ इच्छा आहे. हाच व्यवसाय माझ्या इतर आर्थिक
गरजा भागवू शकते.
माझ्या समुहातील
इतर महिलांनाही मला या व्यवसायात मदतीला घ्यायचे आहे. जेणेकरून त्यांनाही रोजगार मिळेल.
प्रणाली ढवळे
प्रभाग समन्वयक (टेमुर्डा-आबामक्त्ता), उमेद,
ता.
वरोरा