कोरपना : १५ आँगस्ट २०२० रोजी तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष ,कोरपना येथे जागर अस्मितेचा मोहिमेचा शुभारंभ सभापती रुपालीताई तोडसाम यांच्या हस्ते करण्यात आला.
मोहिमेद्वारे पंचायत समिती सभागृह कोरपणा येथे ध्वजारोनानंतर स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून सभापती सौ. रुपालीताई तोडासे यांच्या हस्ते अस्मिता सॅनेटरी नॅपकिन योजनेचा रीतसर शुभारंभ करण्यात आला. यावेळी शासकीय कर्मचारी वर्ग यांच्याकरिता कापडी मास्कचे २ स्टॉल लावण्यात आले. जिल्हास्तरावर कोरपना तालुक्याने तिसèया क्रमांकावर मास्क विक्री केली आहे. एकूण ४ लाखा १४ हजार किमतीचे मास्कची विक्री महिलांनी लाँकडाऊन काळात केली आहे. या कार्यक्रमाला सभापती तोडासे, संवर्ग विकास अधिकारी श्री. पाचपाटील, श्रीमती अस्वले, उपसभापती व श्री. रणदिवे पं.स. सदस्य, श्री. कोवे पं.स. सदस्य, श्री. जीवने पं. स. सदस्य, श्रीमती मालेकर, जि.प.सदस्य, श्री. वाकुडकर (तहसीलदार ), शिक्षणाधिकारी श्री. धुर्वे ,सर्व विभागाचे विभाग प्रमुख, कु. अर्चना बोनसुले (तालुका अभियान व्यवस्थापक ), श्री. संदीप पराते प्रभाग समन्वयक, श्री. संतोष आडे प्रभाग समन्वयक श्री. दिनबा जीवने, श्री.सुरेंद्र कींनाके (कृषी व्यवस्थापक ),सूरज गेडाम, पशुव्यवस्थापक, पोटे ताई, जीवने ताई, qपपलकर ताई , वडे ताई, धवस ताई, साखरकर ताई, रेगुंडवार ताई, नांदेकर ताई, बावणे ताई, मालेकर ताई, श्री. अजय मनवर , कु.सोनल नेवारे व उमेद अभियानातील सर्व चमू उपस्थित होता.
संकलन
श्री.संदीप पराते
प्रभाग समन्वयक