ब्रम्हपूरी
: तालुक्यातील गवर्ला येथे २०/०२/२०१९ रोजी सहभागी पद्धतीने गरीब कुटुंब ओळख
प्रक्रिया(झखझ) राबविण्यात आली.
तालुक्यात
उमेदचे कार्य सुरू असून, संस्थीय बांधणी बळकट करण्याचे काम सुरू
आहे. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाच्या वतीने
सहभागी पद्धतीने गरीब कुटुंब ओळख प्रक्रियागवर्ला येथे राबविण्यात आली.
या
प्रक्रियेदरम्यान दिनांक २०/०२/२०१९ रोजी गवर्ला येथे आढावा बैठक, मशाल
ङ्केरी, गृहभेट, कुटुंब सर्वेक्षण, गाव बैठक, शालेय भेट, या माध्यमातून
गरीब कुटुंबांची ओळख करून घेण्यात आली. ग्रामसंघाच्या पुढाकाराने ही प्रकिया पूर्ण
करण्यात आली. यावेळी झालेल्या विविध कार्यक्रमात गावकèयांनी हिरिरीने सहभाग
नोंदविला.
यावेळी
जिल्हा परिषद शाळा प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामसेवक
मांदाडे,अध्यक्षस्थानी सरपंच नानाजी मुंडरे, ग्रामपंचायत सदस्य
निराशा सोंडवले, गोमाजी राऊत, रेवंदास मिसार, ग्रामसंघ अध्यक्ष
योगिता तुपट यांच्यासह उमेद अभियानाचे तालुका व्यवस्थापक श्री. राऊत, प्रभाग
समन्वयक दिपाली दोडके सहभागी झाले होते.