चंदनखेडा-मुधोली प्रभागांतर्गत वायगाव तुकूम या गावामध्ये उमेद अभियानांतर्गत क्रांती ग्रामसंघ कार्यरत आहे. या ग्रामसंघाच्या प्रयत्नाने गावामध्ये रुरल हाट अर्थात साप्ताहिक बाजार सुरू करण्यात आला.
या बाजाराचे उद्घाटन दिनांक ३० ऑगस्ट रोजी करण्यात आले. क्रांती ग्रामसंघातील महिलांनी गावात प्रत्येक रविवारला साप्ताहिक बाजार भरविण्याकरिता ग्रामपंचायतची परवानगी मागितलेली होती. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आहे. त्यामुळेमहिलांना आता आपल्याच गावात या रूरल हाटच्या माध्यमातून जीवनोपयोगी वस्तूंची खरेदी-विक्री करता येणार आहे. या नावीन्यपूर्ण उपक्रमांचे अनेकांनी स्वागत केले आहे. रुरल हाट सुरू करण्यासाठी प्रभाग समन्वयक हर्षा उमरे यांनी विशेष प्रयत्न केले.