राजुरा:
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियानाच्या तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष,राजुराच्या
वतीने लक्कडकोट येथे ग्रामसंघ मासिक आढावा सभेच्या निमित्ताने हळद आरोग्य मंचची
स्थापना करण्यात आली.
दिनांक
४ फेब्रुवारी २०१९ रोजी
लक्कडकोट येथे ग्रामपंचायत सभागृहात ग्रामसंघाची बैठक घेण्यात आली. यावेळी विविध समुदाय
संसाधन व्यक्तींनी आपल्या कामाचा आढावा सादर केला. कृतीसंगम सखीने
यावेळी परसबागेविषयी मार्गदर्शन करून प्रात्यक्षिके सादर केली. जनजागृती आणि
आरोग्य विषयाची समग्र माहिती सांगितल्यानंतर आरोग्य मंचची स्थापना करण्यात आली.
याच कार्यक्रमात ग्रामसंघात काही पदाधिकाèयांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमात एकूण
९ स्वयंसहायता समुहातील महिला सदस्या व पदाधिकारी सहभागी झाले होते. तालुका अभियान
कक्षाच्या वतीने यावेळी तालुका अभियान व्यवस्थापक
संध्या डोंगरे, तालुका व्यवस्थापक नोविद भडके, कृतीसंगम सखी सीमा कोरवते, बँकसखी रेखा मडावी या उपस्थित होत्या.