सुधारित शेळीपालनात ४४३९ कुटुंबाचा सहभाग

उमेद अभियान चंद्रपूर
0

चिमूर : उमेद अभियानाअंतर्गत ग्रामस्तरावरील ग्रामीण कुटुंबाच्या नवीन उपजीविका सुरू करणे सध्याची उपजीविका बळकट करण्यासाठी जोडधंदा म्हणून सुधारित शेळीपालनास प्राधान्य देण्यात येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात १५ तालुक्यात २०-२१ या आर्थिक वर्षात बकरीपालनाबाबत ६७८३ कुटुंबाचे लक्ष्य असून, सुमारे ४४३९ कुटुंब समाविष्ट झाले आहे. समुदाय पशू व्यवस्थापक आणि पशूसखीच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला जात आहे.

सुधारित पशूपालनासाठी काही बाबीवर विशेष लक्ष केंद्रित करावे लागते. उमेद अभियानात अंतर्गत पशूसखी माङ्र्कत सुधारित शेळीपालनाविषयी माहिती गावागावात पशू सखी माङ्र्कत दिल्या जाते. यामधे गोठा व्यवस्थापन, चारा स्टँड, पाणी स्टँड, जंतुनाशक औषधी, पशुसंवर्धन खात्याअंतर्गत लसीकरण आरोग्य शिबिरे लावणे आदी सेवा दिल्या जातात. शेळ्यांचे वजन वाढविण्याकरिता आरोग्य सुदृढ राहण्याकरिता मसाला बोलस, पशूचाट, दाणामिश्रण, घरेलू हर्बल औषधी निमतेल आदी सेवा दिल्या जातात.

 शेळीपालनातील महत्वाच्या बाबी पुढीलप्रमाणे आहेत.

 शेळ्यांची निवड करणे

  • ·         चांगल्या जातीच्या उत्तम माद्या qकवा जास्त करडे देणा-या उदा. उस्मानाबादी किंवा संगमनेरी जातीच्या शेळ्यांची निवड करणे.
  • ·         प्रजननासाठी १४ ते १८ महिने वयाच्या निरोगी सशक्त माद्या निवडाव्यात.
  • ·         शेळीचे सड कास प्रमाणबध्द योग्यपणे विकसित झालेली असावी.
  • ·         मादी सशक्त, धष्टपुष्ट निरोगी असावी.
  • ·         प्रजननासाठी वापर असावयाच्या नर (बोकड) हा दोन वर्षाचा असावा. तो उच्च दूध उत्पादक जास्त करडे देण्याचा गुण असलेल्या मादीची संतती असला पाहिजे.
  • ·         नर हा मजबूत धष्टपुष्ट पिळदार शरीराचा असावा.
  • ·         नरामध्ये पौरुषत्व पूर्णपणे असावे म्हणजे त्यात लैंगिक इच्छा भरपूर असावी.

 

खच्चीकरण

  • ·         नराकडे ते १५ दिवसांची झाल्यावर त्यापैकी प्रजननासाठी आवश्यक असलेली करडे वगळता इतर सर्व नर करडांचे खच्चीकरण करावे. यामुळे अवांछित प्रजनन थांबविता येते.
  • ·         खच्चीकरणामुळे नराची ऊर्जा वाचते चा-यातील अन्नद्रव्याची ऊर्जा नराच्या शरीर विकासामध्ये वळवली जाते. त्यामुळे वजन वाढते.
  • ·         त्याचे मास कोवळे रुचकर लागते.
  • ·         खच्चीकरण केलेल्या बकèयांची बाजारात मागणी जास्त किंमतही चांगली मिळते.

 

गोठा व्यवस्थापन

  • ·         उन, वारा पाऊस थंडीपासून संरक्षण करण्यासाठी गोठयाची आवश्यकता असते.
  • ·         गोठा हा उंचावर मऊ मुरुमाचा उतार आणि कोरडा असावा.
  • ·         लाइटची व्यवस्था असावी.
  • ·         स्वच्छ  सूर्यप्रकाश मिळाव्या यासाठी खिडक्या असाव्यात.
  • ·         शेळ्यांची जात तसेच वयानुसार वेगवेगळी निवास व्यवस्था असावी.
  • ·         चारा साठविण्यासाठी एक वेगळी खोली असावी.
  • ·         पाण्याची व्यवस्था असावी.
  • ·         नरासाठी, मादीसाठी, करडासाठी आजारी शेळयांसाठी गोठ्यात वेगवेगळे भाग  असावे.
  • ·         शेळयांची विविध ऋतूनसार गोठा व्यवस्थापन करावे यामुळे त्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार नाही खर्च कमी करून उत्पन्न जास्त मिळविता येईल.
  •  

शेळ्यांचे आजार व्यवस्थापन

  • शेळ्यांना त्यांच्या शरीराचे पोषण, शरीर क्रिया सुरळीत चालण्यासाठी, वाढत्या वयाच्या शेळीला स्वतः च्या शरीराच्या वाढीसाठी, प्रजननासाठी गर्भाच्या वाढीसाठी वजन वाढीसाठी चाèयासोबत पौष्टिक आहार द्यावा लागतो.
  • ·         मुल्यवृध्दीकरिता दान मिश्रणाचा वापर करावा.
  • ·         चारा, पाणी हिरवा चारा देण्यासाठी स्टँडचा वापर करावा. जेणेकरून जंतुसंसर्ग होणार नाही.
  • ·         उन्हाळयामध्ये वेगवेगळ्या झाडे झुडपांचा पाला सुकवून त्याची साठवणूक करून ठेवावी. जेणेकरून पावसाळ्यात उपयुक्त ठरेल.
  • ·         तूर, मुंग, उडीद, सोयाबीन . शेंगांची टरङ्कले, कुटार आहारासाठी वापरावा. यामुळे खाद्यात खर्च कमी करून उत्पन्न जास्त मिळविता येईल.

  शेळ्यांचे आरोग्य व्यवस्थापन

  • ·         शेळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी त्यांचे चारा खाणे, रवंथ करणे, पचन क्रिया, वजन वाढ, प्रजनन उत्पादन सर्व व्यवस्थित राहावे यासाठी रोज शेळ्यांची तपासणी करणे त्यानुसार उपाय योजना करणे.
  • ·         शेळयावरील बाह्य परजिविचा (गोचीड) यांचा नाश करावा.
  • ·         शेळ्यांना योग्य वेळी वेगवेगळे रोगाविरूध्द लस लावून घ्यावी.
  • ·         शेळ्यांना पावसाळ्यापूर्वी पावसाळ्यानंतर जंतुनाशक औषधी अवश्य पाजावी. जेणेकरून आरोग्यावर विपरीत परिणाम होणार नाही.
  • ·         एखाद्या रोगाची लागण दिसल्यास लगेचच पशूवैद्याकडून उपचार करून घ्यावा.

  शेळ्यांचा विमा

शेळ्यांचा विमा काढावा. जेणेकरून नैसर्गिक आकस्मिक शेळ्यांचा मृत्यू झाल्यास त्याचा दावा मिळेल आपला शेळीपालन व्यवसाय तोट्यात येणार नाही.

 शेळ्यांची  विक्री

शेळ्यांची विक्री ही अंदाजाने करू नये. कारण दलाल किंवा खाटीक हे स्वतःचा फायदा करूनच शेळ्या खरेदी करतात. ही फसवणूक होऊ नये म्हणून बाजारभावाप्रमाणे वजनाचे आपल्या शेळयाची विक्री करावी. अशा पद्धतीने शेळीपालन केल्यास आपले शेळीपालन व्यवसाय फायदेशीर ठरतो.

 राजेश बारसागडे, चिमूर

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)
Videos Photos