सिंदेवाही, ता. 18 : सिंदेवाही तालुक्यातील देलनवाडी येथे प्रथमच महिलांच्या पुढाकाराने आठवडी बाजार सुरू झाला आणि पहिल्याच दिवशी सुमारे 17 हजारांची विक्री झाली. सेंद्रिय पद्धतीने उत्पादित भाजीपाला, स्टेशनरीसह मत्स्यविक्री असे एकुण 25 स्टॉलनी यात सहभाग घेतला. यामुळे स्थानिक उत्पादक तसेच स्थानिक खरेदीदार यांची मोठी सोय झाली आहे.
उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, पंचायत समिती सिंदेवाही यांच्या अंतर्गत कार्यरत स्वयंसहायता समुहांच्या महिलांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी स्वत: महिलांनी पुढाकार घेतला. माउली महिला ग्रामसंघानी या विषयावर चर्चा करुन ग्रामपंचायतीला बाजारपेठ सुरू करण्याची परवानगी मिळवली. दि.16/02/2021 रोजी या बाजारपेठेचे उदघाटन करण्यात आले. उदघाटन कार्यक्रमाला उदघाटक म्हणून जि. प. चे समाजकल्याण सभापती नागराज गेडाम, अध्यक्ष म्हणून सौ.मंदाताई बाळबुद्धे सभापती,प.स.सिंदेवाही, तर विशेष अतिथी म्हणून गट विकास अधिकारी श्री कुणाल उंदिरवाडे, सरपंच सौ डोंगरावर, श्री रितेश अलमस्त, सदस्य पं.स.सिंदेवाही, श्री अर्जुनकर, उपसरपंच ग्रा.प.देलनवाडी, श्री बोरकर, ग्रामसेवक व संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री विवेक नागरे, तालुका अभियान व्यवस्थापक, सिंदेवाही यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्विते करिता श्री उद्धव मडावी, तालुका व्यवस्थापक, श्री ज्ञानेश्वर मलेवार, प्रभाग समन्वयक कु . सविता उईके प्रभाग समन्वयक, ग्रामसंघ अध्यक्ष लीना आंनदे , सुनीता आंनदे, सुलभा गरमडे, विशाखा रामटेके, अस्मिता लेंझे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. श्री मयूर खोब्रागडे, श्री सचिन लोधे,यांनी सहकार्य केले17 हजारांची उदघाटनाला विक्रीमाउली महिला ग्रामसंघाने घेतलेल्या पुढाकाराला सर्वांनी मोठा प्रतिसाद दिला. अनेक महिला लघूउदयोजिका, भाजीपाला उत्पादक यांनी नव्या बाजारपेठेत सहभाग नोंदविला. एकटया ग्रामसंघातील 19 समूहातील महिलांनी दुकाने लावली. त्यामध्ये सेंद्रिय पद्धतीने उत्पादित भाजीपाला, स्टेशनरी, मत्स्यविक्री असे 25 स्टॉल होते. प्रत्येक रविवारला बाजार भरविण्याचे ठरविण्यात आले आहे.