चंद्रपूर : कोरोना कालावधीत तालुक्यातील अनेक ग्रामसंघांनी धान्य व आवश्यक साहित्याचा पुरवठा करून सामाजिक बांधिलकी जोपासली.
तालुक्यात एकूण ५८ ग्रामसंघ कार्यरत आहेत. संचारबंदी लागू झाल्यानंतर अनेकांची रोजगाराची साधने बंद झाली. हातावर आणून पानावर खाणाèया ग्रामस्थाची परिस्थिती अधिकच नाजूक झाली. अशा परिस्थितीत ग्रामसंघाने आपणही कुठेतरी समाजाचे देणे लागतो, या भावनेतून गावातील एकल, विधवा, अति वृद्ध अशा कुटुंबांना अन्न-धान्य किराणा अशी पूर्ण सामुग्री वाटप केली. ग्रामसंघातून नेहमीच अन्नसुरक्षा या विषयावर चर्चा केली जाते. मात्र, महिलांनी प्रत्यक्ष गावात उपक्रम राबवून इतर ग्रामसंघांसमोर एक उदाहरण ठेवले आहे.
यात जुनोना येथील वृक्षवल्ली, नकोडा येथील विश्वभारती, मोहुर्ली येथील वनश्री, आरवट येथील समृद्धि, घुग्घूस येथील निर्मल या ग्रामसंघांनी पुढाकार घेऊन आपल्या गावांतील गरीब कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊ दिली नाही.