मास्क निर्मितीत चंद्रपूर तालुका अव्वल

उमेद अभियान चंद्रपूर
0

चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, चंद्रपूर अंतर्गत मोठया प्रमाणाात कापडी मास्कची निर्मिती करण्यात आली. यात तालुका अव्वल ठरला आहे.

कोरोना कालावधीत मास्क वापरणे प्रभावी उपाय असल्याने अभियानातील महिलांनी मोठया प्रमाणात मास्कची निर्मिती केली. जिल्हा प्रशासनाच्या आवाहनानंतर मास्क निर्मितीकरिता समुहातील महिला समोर सरसावल्या. पांढरकवडा, दुर्गापूर, चिंचाळा, ऊर्जानगर, घुघुस येथील समूहांनी मोठया प्रमाणात मास्क निर्मिती केली. चंद्रपूर तालुक्याने जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर मास्क निर्मिती आणि विक्री केली.

सर्व रोजगाराची साधने बंद झाली असतानाही मास्क निर्मिती केल्याने महिलांनाही रोजगाराचे साधन मिळाले. शिवणकामाचा अनुभव असलेल्या महिलांनी मास्क निर्मितीसाठी पुढाकार घेतला. जेव्हा कुठलीही शासकीय मागणी नव्हती, तेव्हाही महिला मास्क बनवून - रुपयांपासून गरजूंना पुरवीत होते.

समुहाने ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, शासकीय कार्यालये, खासगी संस्था यास आतापर्यंत आठ लक्ष रुपयांच्या मास्कची विक्री केली आहे. आता त्यांचाकडे चाळीस हजारांपेक्षा जास्त मास्कची मागणी आहे. मास्क बनविणे हे साधे काम नव्हते. कारण संचारबंदीमुळे शहरात प्रवेश नव्हता. तेव्हा मास्कला लागणारा कापड आणण्यासाठी सकाळी सहा वाजता निघून नऊचा आधी पोहचावे लागायचे. खूप त्रास घ्यावा लागायचा. पण तरी कापड कटाई, शिवणे, ऑर्डर घेणे, मास्क पोचविणे अशा कामाची योग्य विभागणी केल्यामुळेच या महिलाना हे शक्य झाले. आताही मास्क निर्मितीचे काम निरंतर सुरू आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)
Videos Photos