ग्रामीण भागातील महिला व किशोरवयीन मुलीमध्ये मासिक पाळी व्यवस्थापन विषयी अजूनही पुरेशी जाणीव जागृती नाही. त्यामुळे महिलांचे आरोग्य आणि मासिक पाळीविषयी अनेक संभ्रम महिलांमध्ये आहेत.हे संभ्रम दूर करणे व मासिक पाळीच्या काळात सॅनीटरी नॅपकिन महिलांनी वापरावे याकरिता उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानचे वतीने “जागर अस्मितेचा” हि मोहीम दिनांक १५ ते ३१ ऑगस्ट या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रत राबविण्यात येत आहे.उमेद तर्फे “अस्मिता प्लस” हे सॅनीटरी नॅपकिन माफक दारात उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामध्ये महिलांकरिता 24 रु दर व शालेय मुलींकरिता अस्मिता कार्ड च्या माध्यमातून 5 रु दराने सॅनीटरी नॅपकिन देण्यात येते. याकरिता तालुक्यातील प्रत्येक गावातून 1 ते 2 अशाप्रकारे एकूण 108 स्वयं सहाय्यता समूहाची नोंदणी करण्यात आलेली आहे.या समूहांना ऑनलाईन प्रशिक्षण व मार्गदर्शन तालुका व राज्य स्तरावरून देण्यात आलेले आहे.सदर समूह महिलांमध्ये या मोहिनेच्या माध्यमांतून जाणीव जागृती व अस्मिता सॅनीटरी नॅपकिन विक्री करण्यात येणार आहेत. स्वयं सहाय्यता समूहांना नॅपकिन विक्रीच्या माध्यमातून रोजगाराचे अतिरिक्त साधन मिळेल या उदेशाने “जागर अस्मितेचा” मोहीम शुभारंभ दिनांक 15 ऑगस्ट 2020 ला तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष,पंचायत समिती,सिंदेवाही येथे मा.सौ. मंदाताई बाळबुधे व सौ शीलाताई कन्नाके उपसभापती प.स.सिंदेवाही यांच्या हस्ते “अस्मिता प्लस” सॅनीटरी नॅपकिन चे अनावरण करण्यात आले.यावेळी मा.श्री.रमाकांत लोधे जि.प.सदस्य चंद्रपूर,श्री. मधुकरजी मडावी माजी उपसभापती तथा सदस्य,मा रितेश अल्मस्त प.स.सदस्य, मा श्री इलूरकर साहेब, गट विकास अधिकारी प.स.सिंदेवाही, श्री पारवे साहेब गट शिक्षण अधिकारी, मा.सुरपाम साहेब पशु संवर्धन अधिकारी प.स.सिंदेवाही यांची उपस्थिती होती. यावेळी उमेद तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष सिंदेवाही चे श्री विवेक नागरे तालुका अभियान व्यवस्थापक यांनी सदर उपक्रमाची संकल्पना सादर केली.
कार्यक्रमाचे यशस्वीतेकारिता श्री अशोक शामकुळे,श्री उध्दव मडावी,श्री राहुल बोपचे,श्री संदीप उईके,श्री ज्ञानेश्वर मालेवर,कु सविता उईके,श्री मनोज दुपारे,श्री प्रफुल मडावी श्री मंगेश पोपटे श्री. सचिन लोढे श्री हर्षद रामटेके श्री मयूर खोब्रागडे,सौ प्रतिभा थेरकर ,तथा सर्व उमेद टीम सिंदेवाही यांनी परिश्रम घेतले.तालुक्यातील सर्व स्वयं सहायता समूहातील महिलांनी या मोहिममध्ये सहभागी व्हावे असे आव्हान उमेद सिंदेवाही तर्फे करण्यात येत आहे.