कोरपना : मी लीलाताई शामराव अस्वले. मी कोरपना तालुक्यातील वनसडी येथील रहिवासी आहे. माझे गाव तालुक्यापासून ८ किमी अंतरावर आहे. घरी माझे पती व दोन मुली असा परिवार आहे. घरी शेती नाही. राहायला घर नाही. बांबूचे कच्चे घर करून आम्ही राहतो. मी माझे पती मजुरी करतात. त्यात माझे घर मी कसेबसे चालवायची. मी एका डोळ्याने अधू असून, माझा फार कमी हातभार माझा संसाराला लागायचा. याचे फार वाईट वाटायचे. कुणाकडे मदतीसाठी किती हात पसरायचे, अशी माझी स्थिती झाली होती.
अशातच अभियानाची माहिती वर्धिनी फेरी दरम्यान मला मिळाली. वर्धिनी फेरीमध्ये मी सदस्य असलेल्या श्रावणी नावाच्या गटाची स्थापना करण्यात आली. अभियानात प्रेरीकेची निवड प्रक्रिया गावात सुरू होती. त्यात काही महिलांनी माझे नाव सुचविले. त्यात माझी निवड झाली. अभियानात काम करताना ब़-याच गोष्टींचे ज्ञान प्राप्त झाले. आपण काम करू शकतो, ही जाणीव मला झाली. त्यात मला शिवणकाम येत असल्याने वडिलांनी एक मशीन घेऊन दिली. मी शिवणकाम सुरू केले. मात्र, जास्त कपडे शिवू शकत नव्हते. मी गटांकडून ५००० रुपये व सखी महिला ग्रामसंघातून ५००० रुपये कर्ज घेतले. त्यात स्वतःची बचत टाकून व पुन्हा तीन मशीन खरेदी केल्या व शिवणकामाचे वर्ग सुरू केले. त्यातील काही मुली मी कqटग केलेले कपडे शिवून देतात. यातून थोडेफार उत्पन्न वाढले. शाळेतील खिचडी शिजविण्याचे माझे समूहाने काम घेतले. हे काम समुहातील महिला आळीपाळीने करू लागल्या. त्यातून सुद्धा मला थोडे उत्पन्न मिळू लागले. अशा प्रकारे माझ्याकडे आजघडीला ४ प्रकारची कामे निर्माण झाली. त्यामुळे महिन्याला १०००० रु उत्पन्न माझे वाढले. मुख्य म्हणजे उत्पन्न वाढल्याने बाहेरून कर्ज घेणे बंद झाले.
कोरोनाच्या स्थितीत माझे पूर्ण कुटुंबांनी मास्क बनविले. सुमारे १५०० मास्क विक्री केली आहे. जर मी अभियानाला जुळले नसते तर माझे गरिबीचे चक्र थांबले नसते. अभियान म्हणजे आमच्यासारख्या कुटुंबांचा आधार आहे.
संकलन
कु. अर्चना एम. बोन्सुले
तालुका अभियान व्यवस्थापक,
कोरपना