सामुहिक कापडी पिशवी व्यवसायाने साधली प्रगती

उमेद अभियान चंद्रपूर
0

ब्रम्हपुरी : आकापूर येथील बिरसा मुंडा स्वयंसहायता समुहांच्या सर्व महिलांनी एकत्र येत कापडी पिशव्या तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला. बाजारात चांगली मागणी असल्याने या समुहाच्या सर्व सदस्यांसाठी हा उत्पन्नवाढीचा चांगला पर्याय ठरला आहे.

आकापूर हे गाव ब्रम्हपुरीपासून ३० किमी अंतरावर आहे. परिसर जंगलव्याप्त असून, नेहमी जंगली प्राण्यांचा वावर असतो. गावांत ०१ जानेवारी २०१४ मध्ये बिरसा मुंडा या स्वयंसहायता समूहाची स्थापना करण्यात आली. अभियानामाङ्र्कत पहिले बँक कर्ज ५०००० रुपयाची उचल करून स्वत:चा वैयक्तिक व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला. नंतर दुस-या वर्षी २००००० रु चे बँक प्रस्ताव सादर केले त्यानुसार कापडी पिशवी कागदी पिशवी तयार करण्याचे समुहाने काम सुरू केले. अभियानातङ्र्के मिळालेले खेळते भांडवलाचे पैसेसुद्धा यामध्ये गुंतवण्यात आले .

सरकारने काढलेल्या प्लास्टिक बंदीमुळे कापडी पिशवी कागदी पिशवी या उद्योगाला आणखी मदत मिळाली. सुरुवातीला बँक कर्ज काढून तीन शिलाई मशीन घेऊन काम सुरू करण्यात आले. प्रशिक्षणासाठी वेळोवेळी मार्गदर्शक म्हणून उमेद अभियान पाठीशी होते. कच्चा माल तसेच प्रशिक्षण यासाठी अभियानाने संपर्क करून मार्गदर्शन केले.

आठवड्याला सुमारे १००० कापडी पिशवी तयार करून त्यांच्या विक्रीतून दर आठवड्याला १०००० रु चे उत्पन्न मिळते. त्यातून साप्ताहिक ३००० रु चा निव्वळ नफा मिळतो. ब्रम्हपुरी तसेच बाजार दुकाने यामध्ये कापडी पिशव्यांची विक्री होऊ लागली. यातून समुहाला मोठा नफा मिळत आहे. यामध्ये समूहातील सर्व सदस्याचा सहभाग असतो. समुहातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध व्हावा, अशी समूहाची अपेक्षा आहे.२०१९ मध्ये हिरकणी महाराष्ट्राची या योजनेत तालुकास्तरीय बक्षीस मिळाले. मनात जर काही करण्याची प्रबळ इच्छा असली तर कितीही संकटे आली तरी आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहचू शकतो, हाच संदेशा या गटाने आपल्या कामातून दिला आहे.

 

संकलन

रितेश बि.मारकवार

प्रभाग समन्वयक

ब्रम्हपुरी

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)
Videos Photos