निरमा व्यवसाय ठरला कुटूंबाचा आधार

उमेद अभियान चंद्रपूर
0
मुल (संकलन हेमचंद उ. बोरकर, ता. मूल, : बरेचजण योग्य संधी न मिळाल्याचं रडगाणं गात असतो. करिअर असो वा नातीगोती नेहमी निमित्त शोधतो असतो. दुसऱ्यावर, परिस्थितीवर, कुणावर किंवा कशांवर तरी खापर फोडण्यासाठी. पण असेही लोक समाजात असतात, ज्यांनी आपल्या फाटक्या नशिबाला ठिगळ लावण्यासाठी स्वकर्तुत्वाच्या बळावर यशाचं साम्राज्य उभ करतात. अशाच एका कर्तुत्वसंपन्न महिलेची हि यशोगाथा.....
मनीषा उत्तरवार यांचा अनवाणी सुरु झालेला हा प्रवास आज स्वकर्तुत्वाच्या जोरावर बाणेदारपणे दोनचाकी गाडीने फिरते आहे. जुनासुर्ला या गावाचा श्री विशाल उत्तरवार यांचाशी आयुष्याची नळ जोडली गेली. प्रथम घरात पदस्पर्श करण्याआधीच आंगण तर काही सांगून गेलं नसेल. घरात अठराविश्व दारिद्रय असल्याने, कशी तरी पोटाची खळगी भरण्यासाठी नवऱ्याची होणारी धावपळ, तिच्या उघड्या डोळ्यांन बघवत नव्हती. डोळ्यात नेहमी आसवांच्या धारांची गर्दी व्हायची.  मात्र, आलेले जीवन रडून जगण्यापेक्षा लढून जगण्यात मजा आहे, ही तिच्या आईची शिकवण आठवली आणि तिने आयुष्याचे ध्येय निश्चित करण्याचे ठरविले. मात्र, करायचं काय. एखादा गृहउद्योग करायचं म्हटलं तर भांडवल लागते. मग ते आणायचं कुठून. एक ना अनेक प्रश्न समोर उभे राहिलेत. गावात उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत १५  स्वयंसहायता समुह कार्यरत होते. डोक्यात वीज चमकली. मात्र मनात भीतीच वादळ. त्या समूहात मला सामील होता येईल कि नाही. कारण हातात एकही पैसा नव्हता. लक्ष्मी स्वयसहायता समूह गावात कार्यरत होता. त्या समूहाकडून मदत घ्यायची व पुढील वाटचाल सुरु करायची हा विचार केला. लक्ष्मी समूहाची सभा लावली व सभेत मनीषाताईने कर्जाची मागणी केली. मनीषा ताईची वागणूक व स्वभाव पाहून तिला त्याच समूहात सामील करून घेतलं. एका होतकरू महिलेला मदत केलीच पाहिजे हा विचार करून मनीषा ताईला समूहातून  ५००० रुपये कर्ज दिले.
गृहउद्योगाची कल्पना डोक्यात होतीच. पैसाही मिळाला. मग तिने निरमा पावडर विक्रीचा व्यवसाय सुरु केला. शहरात जावून निरम्याच्या बॅग आणायची. रात्रभर घरी पॅकिंग करायचं व सकाळी उठून विकण्यासाठी गावोगावी फिरायचं, हा रोजचाच उपक्रम झाला होता. हे सारं बघताना गावातील काही लोक हसायची. नातेवाईक हिणवायचे, शेजारी हिणवायचे. मात्र, घेतलेला वसा कधीही टाकायचा नाही म्हणून मनीषाने कुणाच्याही हसण्याची, बोलण्याची पर्वा न करता आपला उद्योग चालूच ठेवला.
एकेकाळी कधी पायी, तर कधी सायकलने फिरून निरमा विकणारी मनीषा आज दोन चाकी गाडीवर निरमा विकत आहे. हा तिच्या जिद्दीच्या व मेहनतीचा विजय झाला. ५००० रुपये पासून सुरु केलेला व्यवसाय आज ५०००० रुपयाची उलाढाल करते आहे. आज मनीषा ताईला तिच्या गावात व कुटुंबात मानाचे स्थान प्राप्त झालेले आहे. आज गावातील इतर महिला व गाव त्यांच्याकडे सन्मानाने पाहते.

संकलन
हेमचंद उ. बोरकर
तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, मुल
ता. मुल जि. चंद्रपूर

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)
Videos Photos