नेरी :- येथुन जवळच असलेल्या गोंदेडा गुंफा येथे १३ मार्चला उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष चिमूर तर्फ मासळ मदनापूर प्रभागातील नारी शक्ती महिला प्रभाग संघाचे वार्षिक स्नेहसंमेलन तपोभुमीतील सभागृहात उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी नारी शक्ती महिला प्रभाग संघाच्या अध्यक्ष सौ.संगीत निकेसर उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून नारी शक्ती महिला प्रभाग संघाच्या सचिव सौ नेवाशा झाडे, बॅंक मॅनेजर विकास कोकोडे ,प्रा.उरकुळे सर, तालुका अभियान व्यवस्थापक मा.राजेश बारसागडे साहेब, तालुका व्यवस्थापक प्रशांत मडावी साहेब, प्रभाग समन्वयक सपना उराडे, मेघदिप ब्राम्हणे साहेब उपस्थित होते.
या कार्यक्रमात मासळ मदनापूर प्रभागातील नारी शक्ती महिला प्रभागसंघाचे वार्षिक लेखा जोखा व सर्वसाधारण सभा झाली . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश बारसागडे यांनी केले तर संचालन किरणकुमार मेश्राम यांनी केले आभार प्रदर्शन लिना राऊत यांनी मानले. या कार्यक्रमात महिलाचे उमेद - ग्रामीण जीवनोन्नती अभियानावर आधारीत कार्यक्रम झाले. या कार्यक्रमाला मासळ मदनापूर प्रभागातील महीलाची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती