नागभिड (संकलन : मोहित नैताम, तालुका अभियान व्यवस्थापक उमेद, नागभिड) : माझं नाव निता अरविंद बोरकर असून, मी दीपशिखा स्वयंसहाय्यता समूहामध्ये सचिव म्हणून कार्यरत आहे. खरं म्हटलं तर अभियान म्हणजे काय हे मला माहीतच नव्हतं. माझं आधीच जीवन म्हणजे दुसऱ्याच्या भरवशावर होतं. पण अभियानातून पुढे पाऊल टाकून मी आज स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे.
आज ही यशोगाथा सांगत असताना माझा भूतकाळ समोर येत आहे. माझं मूळ गाव म्हणजे माझं सासर ब्रह्मपुरी. 2006 मध्ये माझं लग्न झालं परंतु माझं संसार जास्त दिवस आनंदी राहू शकला नाही. 2010 मध्ये माझ्या कुटुंबाला खूप मोठा हादरा बसला. आमच्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या घरच्यांना म्हणजे नवऱ्याला 2010 मध्ये गंभीर आजार झाला आणि याच वर्षी त्यांचा मृत्यू झाला आणि पूर्ण कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आली. हे दुःख सोसत असताना माझा मुलगा नऊ महिन्याचा आणि मुलगी दीड वर्षाची होती. माझ्यासमोर प्रश्न होता हे लहान चिमुकले लेकरे घेऊन जावं तरी कुठं. त्यानंतर मी निर्णय घेतला माहेरी जाण्याचा. माझं माहेर म्हणजे नागभीड तालुक्यातील आकापुर हे गाव. 1206 लोकसंख्या असलेला हा गाव. माझ्या कुटुंबात माझी आई-वडील, भाचे, दोन भाऊ आणि त्यांच्या दोन पत्नी. एवढं भरलेलं कुटुंब की, मलाच कुठेतरी खंत वाटायची की इतका मोठा आपलं जीवन आहे, ते दुसऱ्याच्या भरवशावर कसं जगायचं. माझे लहान- लहान मुलं होते. स्वतःच्या पायावर मला उभं व्हायचं होतं. परमेश्वराच्या कृपेने अभियान 2014 मध्ये गावात आले. अभियानांमध्ये सीआरपी म्हणून माझी निवड झाली. सीआरपी झाल्याबरोबरच लोकांचा गावात मोठ्या प्रमाणात विरोध व्हायला लागला. हि तर आपल्या गावाची नाही. मग हिला सीआरपी म्हणून का घ्यायचं. तरी पण मी सीआरपी म्हणून काम स्वीकारलं.
अभियानामध्ये काम करू लागल्यानंतर सर्व समूहांना योजना, समूहाचे व्यवहार याबाबत महिलांना माहिती देवू लागली आणि स्वत:पण शिकू लागली. संपूर्ण गावातील कुटुंब अभियानामध्ये समाविष्ट केले. अभियाना अंतर्गत जास्तीत जास्त कुटुंबापर्यत योजना पोहचविण्याचे काम केले आणि हे सगळे शक्य झाले असेल तर उमेद अभियानामुळेच. काम करत असतांना सर्व लोकांचा माझ्यावर विश्वास बसला. जे लोक आधी विरोध करत होते, आता तेच मला प्रोत्साहित करत होते.
गावातील लोकांनी मला ग्रामपंचायत निवडणुकीकरिता उभे केलं आणि गावाचा सरपंच बनविले. खरे तर माझ्या जीवनात येणारे हे यश माझ्यासाठी एक नवीन अनुभव देऊन जात होते. प्रत्येक माणसाच्या जीवनात अडचणी येतात. पण जो त्या अडचणींना समोर जातो यश त्याच्याच पदरात पडत. समोर सरपंच होऊन गावातील लोकांसाठीच काम करत राहिली. काम करीत असतांना 2015 मध्ये ग्राम पंचायत आकापूर ला स्मार्ट ग्रामपंचायत पुरस्कार मिळाला. एकूण 10 लाख रु. बक्षिसाची रक्कम होती आणि आम्ही गावाच्या विकासाकडे वाटचाल करायला लागलो. समाजात मान, प्रतिष्ठा वाढायला लागली. मी कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता कि उमेद अभियानामुळे मला इतक समोर जायला मिळेल.
एवढेच नाही तर उमेद अभियानातून कर्ज उचलले आणि माझ्या मानधनाची काही रक्कम मिळून 1000 रुपयाचे कपडे घेऊन आणले आणि छोटीशी कपड्यांचे दुकान सुरु केले. 1000 हजारां पासून सुरु केलेल्या व्यवसायापासून आज माझे दुकान हे मोठे झाले आणि आज त्या दुकानाची किंमत 10 लाखापर्यंत आहे. मी माझा व्यवसाय बाहेरगावी जाऊन सुद्धा करते. म्हणून दोन चाकी आणि चार चाकी वाहन सुद्धा मी खरेदी केले. जेणेकरून व्यवसाय वाढवायला सोयीचे होईल.
उमेद अभियानाच्या माध्यमातून माझी उपजीविका म्हणजेच माझा व्यवसाय खूप चांगला चालत आहे. यामुळेच मी माझ्या मुलांना खूप चांगल शिक्षण देऊ शकत आहे. असे समृद्ध जीवन जगतांना खरच खूप समाधान वाटत. आता माझे स्वत:चे दुकान, गाडी, घर हे सगळ आहे. आता मी दुसऱ्यांच्या भरवश्यावर नाही, तर स्वत: सक्षम आहे.
संकलन
मोहित नैताम
तालुका अभियान व्यवस्थापक
उमेद, नागभिड