सहयाद्री समुहाचे सुरू केली रोपवाटिका

उमेद अभियान चंद्रपूर
0

 भद्रावती (संकलन, अल्का हं. इनवते, प्रभाग समन्वयक)) : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान महिलांच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी कार्यरत आहे. महिलांच्या मनामध्ये एक नवीन दिशा देण्यात व त्यांच्यात विकासात्मक बदल घडवून आणण्यात अभियान यशस्वी ठरत आहे. एकजुटीने एकत्र येऊन स्वविकास घडून येतो, हा विश्वास निर्माण झाला आहे. शाश्वत उपजीविकेची उमेद त्यांचा मनात खोलवर जावून एक नवीन दिशा त्यांना मिळत आहे.
चालबर्डी üया गावात एकूण 250 कुटुंब आहेत.  गावात  सहयाद्री स्वयंसहायता समुह स्थापन करण्यात आला. या गटासह गावात एकूण 18 समूह आहेत. सहयाद्री समूहात 10 सदस्य आहेत. या 10 सदस्यांनी व्यवसाय करण्याचा विचार सहयाद्री गटांनी केला. परंतु पैसा कमी असल्यामुळे त्यांनी बंकेकडून 50,000 हजार रु. कर्ज घेतले. तसेच त्यांनी स्वत:ची बचत या कामी वापरली. अभियानातून मिळालेला फिरता निधी 15000 हजार रु. असे मिळून त्यांनी माहे जून 2019 पासून त्यांनी वृक्ष रोपवाटीका सुरू केली.
सर्वात प्रथम प्रत्येक सदस्यांनी 50 ते 100 वेगवेगळ्या प्रजातीची रोपे तयार केली. पहिल्या टप्यात एकुण 310 रोपे तयार झालेत.  त्यात ओषधी वनस्पति ,फुलाचे झाडे, सागवण व इतर रोपे तयार करण्यात आली. हे सर्व तयार करण्यासाठी 20,000 हजार रुपये खर्च झाला. रोपवाटीकेसाठी एक सदस्यांने स्वत:च्या शेतात जागा दिली. सर्व महिला एकत्र येवून रोपवाटिकेची निगा राखतात. 
या नाविण्यपुर्ण उपक्रमाची दखल पुरस्काराच्या निमित्ताने झाली. हिरकणी नवउद्योजक या स्पर्धेत समुहाने सहभाग नोंदविला.  तालुकास्तरावर त्यांना 50 हजार रुपये पुरस्कार मिळाला. तसेच त्यांनी बॅकेकडुन 1 लाख कर्ज घेतले. त्यामूळे पुन्हा विश्वास निर्माण झाला. आज त्यांनी महिण्याचा 2 ते 3 हजार रुपये नफा मिळत आहे. त्यांनी कर्ज परतफेड करणे करणे सुरू आहे. हे सर्व करताना अभियानाने त्यांना 'उमेद' दिली.  एक नवा आत्मविश्वास निर्माण झाल्याने सह्याद्रि समुहातील महिलांच्या आर्थिक परिस्थितीत बदल होण्यास सुरूवात होईल.

सहयाद्री स्वयंसहायता समुह. भद्रावती
संकलन : अल्का हं. झ्नवाते (प्रभाग समन्वयक)
 प्रभाग- कोंढा-घोडपेठ

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)
Videos Photos