जागृती समुहांची ज्वेलरी उद्योगातुन भरारी ..!!!

उमेद अभियान चंद्रपूर
0

बल्लारपूर (संकलन : सुकेशीनी गणवीर, प्रभाग समन्वयक ) : बल्लारपूर तालुक्यातील कोठारी हे गाव जवळपास 5000 लोकसंख्येचे गाव आहे. गावामध्ये बहुतांश शेतकरी व मजुरवर्ग आहे. महत्वाचे म्हणजे कोठारी हे गाव बल्लारपूर व गोंडपिंपरी या गावाच्या मध्यावर असुन, सोबत बाजूला पोंभुर्णा तालुक्याची सीमासुध्दा लागली आहे.

कोठारी या गावामध्ये दिनांक 2/9/2017 ला जागृती महिला स्वंयसहाय्यता समुह स्थापन करण्यात आला. या समुहातील दहाही महिलांचे आर्थिक जीवनमान साधारणत: गरीबीचे होते. समुहातील 10 महिलांपैकी विश्रांती, सरिता, वर्षा, उषाताईचे इयत्ता 4 थी पर्यंत व सुजाता ताईचे 12 वी पर्यंत शिक्षण झाले आहे. प्रामुख्याने आपल्या कौशल्याच्या बळावर सर्व महिलांना प्रशिक्षित करणा-या उज्वला ताई यांनी B.A पर्यंतचे व प्रगतीताईने 10 वी पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले आहे. या सर्वानी समान ध्येय ठेवुन व बचत करणे व स्वत:ची सर्वांगीण प्रगती करण्याच्या उददेशाने उमेदच्या माध्यमातुन स्वयंसहाय्यता समुहामध्ये सामील झाल्या. 100 रु बचत करुन समुहाची सुरुवात केली.

एके दिवशी संकल्प ग्रामसंघाच्या सभेमध्ये उज्वला व प्रगती ताई यांनी आपल्या कलाकृतीने तयार केलेले काही ज्वलेरी जसे की, बांगडया, नेकलेस, कर्णफुले ग्रामसभेच्या सभेमध्ये आणले. या ज्वेलरी वस्तु बघुन भविष्यात यास व्यवसाय म्हणून संधी असल्याचे उमेद चमूच्या लक्षात आले. उमेद चमूने समुहांना व्यवसायाबाबत माहिती दिली. व्यवसायासाठी पैशाची गरज होती. त्यासाठी बँकेकडून एक लाख रुपये व 15000 चे खेळते भांडवलचा वापर करण्यात आला. उज्वला व प्रगती ताई यांनी सर्व समुहातील महिला सदस्यांना ज्वेलरी कशी बनवायची, ही जबाबदारी स्वीकारली. सर्वानी एकमताने निर्णय घेतला की सर्वांनी ज्वेलरी व्यवसाय करायचा व त्या व्यवसायाच्या माध्यामातुन आपली आर्थिक प्रगती साधायची.

व्यवसायाला सुरुवात केल्यानंतर उमेद अभियानामार्फत मुंबई येथे ग्रामविकास भवन येथे जाण्याची व विक्री करण्याची संधी मिळाली. त्यात त्यांनी 30 हजार पर्यतची विक्री केली. येवढेच नाही तर सन 2019 ला झालेल्या राणी हीराई पुरस्कारसुध्दा समुहाने पटकावला. सोबतच आज त्या वर्षाकाठी किमान 2 लाखाचा वार्षीक उलाढाल करतात. हे सर्व करताना या 10 ही महीला एकजुटीने तनमनधनाने मिळुन ज्वेलरी व्यवसाय करतात. आज या व्यवसायाच्या माध्यमातुन त्‍यांनी आपली आर्थिक प्रगती साधली आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)
Videos Photos