बल्लारपूर (सुकेशिनी गणविर) : किन्ही येथील क्रांती स्वयंसहायता समुहाने उदयोगशिलता जपत दुग्धव्यवसायाच्या अनुभवानंतर कुक्कूटपालन व्यवसाय सुरू केला आहे. सलगपणे पाच वर्षापासून त्यांचा हा उपक्रम सुरू असून, सहभागी महिलांना नियमित स्वरुपात अर्थार्जन होत आहे.
पूर्व विदर्भातील चंद्रपूर जिल्हयातील बल्लारपूर तसा शेतीप्रधान तालुका. मात्र, नैसर्गिक आपत्ती आणि पाण्याच्या अपुऱ्या साधनांमुळे दिवसेंदिवस महिलांचा ओढा पुरक व्यवसायाकडे वाढत चालला आहे. या तालुक्यातील ‘किन्ही’ हे तसे लहानसे गाव. या गावाचा मुख्य व्यवसाय शेती आहे. मात्र, पाण्याअभावी दुबार पिक घेता येत नसल्याने नागरिकांची ओढताण होत असते.
क्रांती समुहाची स्थापना 09/08/2007 ला झाली. मात्र, बचतीशिवाय समुहाचा दुसरा फायदा होत नव्हता. जिल्हयात उमेद अभियानाची सुरूवात झाल्यानंतर 2014 मध्ये या समुहाचे पुर्णगठन करण्यात आले. वेगवेगळी प्रशिक्षणे देण्यात आली. एकुण 10 सदस्यसंख्या असलेल्या ‘क्रांती’ समुहाने आरसेटी या संस्थेकडून प्रशिक्षण घेतले होते. त्यांनी दुग्धव्यवसाय सुरू केला. या व्यवसायात ते यशस्वी झाले. सन 2016 मध्ये झालेल्या हिराई महोत्स्तवात त्यांनी प्रथम पारीतोषीकसुदधा मिळविले. त्यानंतर समुहाचा सुक्ष्म नियोजन आराखडा तयार करण्यात आला. गटाला 60000 रूपये इतका समुदाय संसाधन निधी मिळाला. सोबतच समुहाने बँकेकडून एक लाख रूपये कर्ज घेतले. या पैशातून त्यांनी कुक्कुटपालन व्यवसाय करायचे ठरविले. दर्जेदार पक्षी आणून त्यांनी व्यवसाय सुरू केला. सध्या त्यांच्याकडे कडकनाथ, गिरीराज व गावठी प्रजातीचे पक्षी आहेत. ते विक्रीकरीता जवळच असलेल्या बल्लारपूर शहरात आणतात. गावठी पक्षांना असलेली स्वादिष्ट चव व कडकनाथ पक्ष्यात असलेल्या औषधी गुणधर्मामुळे समुहांच्या पक्षांना मोठी मागणी असते. कुक्कूटपालनाचा व्यवसाय शास्त्रोक्त पध्दतीने केला जात असून, आर्थिक नोंदी व्यवस्थीतपणे ठेवल्या जात आहेत. त्यांच्या व्यवसायाला उमेद अभियानाकडून वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते. या व्यवसायामुळे महिलाचे जीवनमान व आर्थिक स्तर उंचावला आहे.
(संपादन : गजानन ताजने, जिव्य. ज्ञान व्यवस्थापन)