रत्नापुर येथे तालुकास्तरीय डेमो परसबाग

उमेद अभियान चंद्रपूर
0
सिंदेवाही : उमेद- तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, सिंदेवाहीच्या वतीने कृतीसंगम उपक्रम अंतर्गत आई महिला ग्रामसंघ रत्नापुर येथे दिनांक 16/11/2019 ला तालुकास्तरीय डेमो परसबाग तयार करण्यात आली.
सदर परसबाग 50X50 फुट आकारात तयार करण्यात आली. सुर्या मॉडेल पध्दतीने 21 वाफे तयार करण्यात आलेत. रोज ताजा व घरच्या घरी सेंद्रीय भाजीपाला खाण्यास मिळावा. लागणारा खर्च वाचावा, खुल्या जागेचा वापर व्हावा, सांडपाण्याचे व्यवस्थापन व्हावे, आजारावरील खर्च वाचावा, आहारात पोष्ठीक तत्व मिळावे, कुपोषण मुक्तीला मदत व्हावी व प्रत्येक महिलांनी आपल्या घरी परसबाग तयार करावी, या उददेशाने सदर परसबाग तयार करण्यात आली. परसबागेकरिता श्री. हरिदासजी लोधे यांनी स्वत:ची जागा उपलब्ध करुन दिली.
यावेळी पंचायत समिती , सभापती श्री. मधुकरजी मडावी व सरपंच श्री. सदाशिवजी मेश्राम यांनी उपस्थित राहुन आरोग्य विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी सदर परसबाग उपक्रमाचे व अभियानाचे कौतुक केले. सदर उपक्रम पुर्ण करण्याकरिता तालुका उमेदचे संपुर्ण चमू, कृतीसंगम सखी, कृषीसखी , CAM , CLM व आई महिला ग्रामसंघ रत्नापुर येथील पदाधिकारी व

समुदाय संसाधन व्यक्ती व वर्धिणी यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)
Videos Photos