बल्लारपूर (संकलन : चतुरदास माऊलीकर) बल्लारपूर तालुक्यातील शैलजा नगराळे हिने स्वयंसहायता समुहाच्या माध्यमातून शिवणक्लास सुरू केले. तिलाही अर्थाजर्नाचे बळकट साधन प्राप्त झाले आणि त्यांच्याकडे प्रशिक्षण घेतल्यामुळे परिसरातील अनेक महिलांनही जोडधंदा सुरू केला आहे.
बामणी येथील 37 वर्षीय शैलजाच्या घरची स्थिती बेताची असल्याने ती सातत्याने संधीच्या शोधात होती. मात्र, भांडवलाची अडचण येत होतती. कुटुंबात पती व दोन मुले आहेत. मुल शिक्षण घेत आहेत. तीला शिवणकाम येत होते. त्यामुळे शिवणकामाचे वर्ग सुरू करण्याची तीची खूप इच्छा होती. सतत काहीतरी व्यवसाय उभारावा, असे नेहमी तीला वाटत होते. पण त्याकरीता लागणारे भांडवल, व्यवसायाची माहिती मिळत नव्हती. यादरम्यान महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाबददल समुदाय संसाधन व्यक्ती निलीमाताई झरकर हिच्याकडून तिला माहिती मिळाली. त्यानंतर ती समुहामध्ये सहभागी झाली. समुहाला जुळल्यानंतर तिला अभियान राबवित असलेल्या अनेक उपक्रमांबाबत माहिती मिळाली.
दिपज्योती महिला स्वयंसहाय्यता समुहाच्या आठवडी बैठकीमध्ये तीने व्यवसाय करण्याची बाब मांडली. तेव्हा सर्व सहकारी महिलांनी तीचे कौतुक केले आणि समुहाकडून कर्ज देण्याचे कबुल केले. समुहाचे कर्ज आणि बॅकेकडून रु 100000/- कर्ज घेवून शैलजाने ब्युटीपॉर्लर व शिवणक्लास हा व्यवसाय सुरु केला आहे. या व्यवसायाचा लवकरच जम बसला. कर्ज परतफेड सुरू झाली. कर्ज परत करुन पदराशी रक्कम शिल्लक राहू लागली. समुहाच्या सदस्यांनी हिंमत आणि पाठीशी असल्याचा विश्वास दाखविला नसता, तर मी व्यवसाय सुरू करु शकले नसते, असे ती म्हणते. माझ्या आर्थिक परिस्थिती बरीच सुधारणा झाली आहे. उमेद अभियानामुळे मला आणि माझ्या कुटुंबाला जीवन जगण्याची दिशा मिळाल्याचे ती म्हणते. शैलजा भिमराव नगराळे विणकाम, भरतकाम शिकवतात. यामुळे इतर महिलांनीही व्यवसाय सुरु केले. त्यांच्याही उत्पन्नात भर पडली आहे. बँक कर्जच देत नाही, हा गैरसमजही अभियानामुळे दूर होत आहे.
संपादन : गजानन ताजने
जि. व्य. ज्ञान व्यवस्थापनउमेद, चंद्रपूर