दस्तावेजीकरण व ज्ञान व्यवस्थापन विषयावर कार्यशाळा

उमेद अभियान चंद्रपूर
0
 चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाच्या वतीने दिनांक 6 व 7 नोव्हेंबर 2019 रोजी दस्तावेजीकरण व ज्ञान व्यवस्थापन विषयावर कार्यशाळा घेण्यात आली.
जिल्हा परिषेदच्या समिती कक्षात झालेल्या या कार्यशाळेत दोन दिवसांत एकुण 60 क्षेत्रसमन्वयक, तालुका व्यवस्थापक यांना दस्तावेजीकरण आणि उमेद अभियानात त्याचा उपयोग यावर जिल्हा व्यवस्थापक गजानन ताजने यांनी मार्गदर्शन करण्यात आले. ज्ञान निर्मितीचे टप्पे आणि अभियानाची अमलबजावणी याचा कसा मेळ घालता येतो व अभियानाची गती कशी वाढविता येते, यावरील विविध विषयावर या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. दस्तावेजीकरणाचे वेगवेगळे स्त्रोंत आणि त्याचा प्रभावी वापर तसेच दस्तावेजीकरणाचे वेगवेगळे पर्याय यावर उदाहरणाव्दारे मार्गदर्शन करण्यात आले आहे.

कार्यशाळेत यशोगाथा लेखनाचे कौशल्य, घ्यावयाची काळजी, यशोगाथांचे विषय, छायाचित्रण करताना कोणती काळजी घ्यावी यावर मार्गदर्शन केले. स्वयंसहायता समुहातील महिलांच्या प्रगतीचे टप्प्यांची चित्रफित कशी करावी, यावरही मार्गदर्शन करण्यात आले. 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)
Videos Photos