मूल येथील मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेट

उमेद अभियान चंद्रपूर
0

मूल : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती येथे आज दिनांक 2 नोव्हेंबर 2022 रोजी मा.श्री विवेक जॉनसन सर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.पं.चंद्रपूर यांनी भेट देऊन अभियान अंतर्गत सुरू असलेले विविध विकासकामांचा आढावा घेतला. अभियानाअंतर्गत सुरू असलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाची सविस्तर माहिती श्री नितीन वाघमारे, तालुका अभियान व्यवस्थापक यांनी सादर दिली. 

विविध उपक्रमाचे उद्घाटन 

1.  डेमो युनिट (शेंद्रिय निविष्ठा केंद्र) चे उद्घाटन:- 

अभियान अंतर्गत वृंदावन प्रभाग संघ, मारोडा येथे सुरू असलेल्या IFC प्रकल्पाच्या प्रगती कामाला मा. मुख्य कार्यकारी अधिकारी  यांनी क्षेत्रभेट दिली यांचे औचित्य साधून आज मारोडा येथे डेमो युनिट (शेंद्रिय निविष्ठा केंद्र) चे उद्घाटन करण्यात आले यातून प्रभागातील महिला व पुरुष शेतकरी यांना शेंद्रिय शेतीची लागवड बाबत प्रोत्साहन केले जाणार असून अल्प दरात भेसळ मुक्त गांडूळ खत, ब्रह्मस्त्र, निम्हस्त्र, निबोळी अर्क, दशपर्णी इत्यादी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

2) उपजीविका केंद्राचे उद्घाटन :- 

अभियान अंतर्गत तालुक्यातील तसेच प्रभागातील महिलांचे उत्पादनाचे एकत्रिकरण करून त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे काम या केंद्रामार्फ़त करण्यात येणार आहे तसेच अभियानाच्या विविध सेवांचा लाभ या केंद्रा मार्फ़त देण्यात येणार आहे. 

3) कृषी औजार बँकेचे उदघाटन :- तालुक्यात मानव विकास मिशन अंतर्गत 75% सवलतीत  कृषी अवजार बँक उपलब्ध करून देण्यात आली असून शेतीच्या विविध कामात अभियानातील  शेतकरी महिलांना याचा लाभ होणार आहे.

तसेच प्रभाग संघाचे अध्यक्ष व इतर कार्यकारणी व गावातील महिलांसोबत अभिनाच्या विकास कामाबाबत चर्चा केली सुरू असलेल्या कामाबाबत महिलांचे कौतुक केले. यावेळी गट विकास अधिकारी मा. श्री.देव घृणावत सर, विविध विभागाचे विभागप्रमुख उमेद टीम, सरपंच व ग्रामसेवक अभियानातील महिला इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)
Videos Photos