वरोरा : उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, चंद्रपूर व तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष,पंचायत समिती, वरोराचे संयुक्त विद्यमाने "दिवाळी सणाच्या निमित्ताने दिनांक २० ते २१ /१०/२०२२ या कालावधीत स्वयंसहायता समूहांनी तयार केलेला फराळ , सजावटीच्या वस्तू विक्री प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आलेले आहे. आज दुपारी १२ वाजता महोत्सवाचे उद्घाटन आमदार मा.सौ. प्रतिभाताई धानोरकर मॅडम यांचे हस्ते पार पडले. त्यावेळी गट विकास अधिकारी मा.श्री.संदीप गोडशेलवार सर, तालुका अभियान व्यवस्थापक , विविध विभागाचे अधिकारी, प्रभाग संघ पदाधिकारी व उमेद टीम, कॅडर, समूह महिला उपस्थित होते. महोत्सवात एकूण २४ समूहाचे स्टॉल लावण्यात आलेले आहे.
Post a Comment
0Comments