नागभिड : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियानाच्या माध्यमातून जास्तीत जास्त कुटुंबांची उपजीविका वृद्धी करण्याचे काम उपजीविका सखीच्या माध्यमातून सुरू आहे. अश्या कृषी सखी , पशु सखी, संसाधन केंद्राच्या पदाधिकारी यांचे अभ्यास सहल नागपूर जिल्यातील उमरेड तालुक्यातील भारत वर्ष नेचर फॉर्म येथे आयोजित करण्यात आलेली होती.
मानव विकास प्रकल्प च्या माध्यमातून कृषी उन्नती संसाधन केंद्र व पशु उन्नती संसाधन केंद्राचे उपजीविका प्रकल्प नागभीड तालुक्यात मंजूर झालेले आहेत. कृषी उन्नती संसाधन केंद्र मध्ये गांडूळ खत ,विविध सेंद्रिय औषधी बनवण्याचे काम करण्यात येणार आहे. तसेच पशु उन्नती संसाधन केंद्राच्या माध्यमातून मुरघास, दाना मिश्रण, मसाला बोलस, चाटणवीट, हरबल जंत नाशक, पशुपालकांना विविध पशु विषयक सेवा संबंधी मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून सदर ची अभ्यास सहलिचे नियोजन करण्यात आले होते. भारत वर्ष नेचर फॉर्म येथे यंत्राच्या माध्यमातून मुरघास निर्मिती केल्या जाते तसेच विविध उपजीविका प्रकल्प येथे आहेत जसे मुरघास निर्मिती प्रकल्प, गांडूळ खत निर्मिती प्रकल्प, गोशाळा, विविध दुग्धजन्य पदार्थ निर्मिती प्रकल्प, विविध औषधी वनस्पती, विविध फळांच्या बागा, पॉलिहाऊस, नर्सरी इत्यादीसदरच्या अभ्यास सहलीला तालुक्यांतर्गत 50 उपजीविका सखी, संसाधन केंद्राचे पदाधिकारी सहभागी झालेल्या होत्या तसेच तालुका अभियान व्यवस्थापक श्री मोहित नैताम, तालुका व्यवस्थापक श्री आमिर पठाण, अमोल मोडक, प्रभाग समन्वयक ज्योती साळवे, दीपक गायकवाड, शुभम देशमुख, गजानन गोहणे, कृषी व्यवस्थापक किशोर मेश्राम, पशु व्यवस्थापक जगदीश हजारे, शालू खोब्रागडे,मत्स्य व्यवस्थापक नंदकिशोर डाहारे उपस्थित होते.