जिल्हाधिकारी यांच्या हस्ते हर घर तिरंगा उपक्रमास सुरूवात

उमेद अभियान चंद्रपूर
0

चंद्रपूर  : दिनांक १ ऑगस्ट २०२२ ला  जिल्हा अभियान  व्यवस्थापन कक्ष  चंद्रपूर  तथा  तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष  प.समिती चंद्रपूर  यांच्या समन्वयातून  आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमा अंतर्गत हर घर तिरंगा  हे उपक्रम जिल्ह्यामध्ये यशस्वी पने राबविण्याकरिता  तसेच प्रत्येक कुटुंबापर्यंत आपले राष्ट्रध्वज पोहोचविन्याकरिता उमेद अभियानाच्या माध्यमातून याची सुरुवात    जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यामध्ये प.समिती स्तरावर राष्ट्रध्वज विक्री केंद्र उघडण्यात येत आहेत . त्याचाच एक भाग  आज दिनांक १ ऑगस्ट २०२२ ला मा. अजय गुल्हाने जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या शुभ हस्ते हर घर तिरंगा  ( राष्ट्रध्वज विक्री केंद्र ) या उपक्रमाचे विधिवत उद्घाटन करण्यात आले . या उद्घाटनप्रसंगी  प्रमुख उपस्थिती मा. डॉ.मिताली सेठी  मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.चंद्रपूर, मा. वर्षा गौरकर अति. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सह  संचालक  महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान चंद्रपूर , मा. कपिलनाथ कलोडे उप मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.चंद्रपूर  तसेच मा. आशुतोष सपकाळ गट विकास अधिकारी प.समिती चंद्रपूर . जिल्ह्यातील  हर घर तिरंगा उपक्रमाची  यशस्वी अमलबजावणी करण्याबाबत मा.अजय गुल्हाने जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी मार्गदर्शन केले .तसेच राष्ट्रध्वज प्रत्येक घरांमध्ये व्यवस्थित  वेळेत पोहोचविणे  करिता नियोजन  बाबत  मा. डॉ.मिताली सेठी  मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.चंद्रपूर, यांनी सूचना  केल्यात . याप्रसंगी जिल्हा अभियान व्यवस्थापक मनोहर वाकडे , जिल्हा व्यवस्थापक  प्रवीण भांडारकर यांनी कार्यक्रमाचे संचालन केले . कार्यक्रमाच्या याशास्वीतेकारीता  तालुका अभियान व्यवस्थापक शीतल देरकर,  तालुका   प्रतीक्षा खोब्रागडे , तालुका  व्यवस्थापक जयश्री नागदेवते , सर्व प्रभाग समन्वयक तथा सर्व केडर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता प्रयत्न केले.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)
Videos Photos