आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत पशुसंवर्धन विषयावर कार्यशाळा

उमेद अभियान चंद्रपूर
0

चंद्रपूर : दिनांक 13/5/2022 ला पंचायत समिती सभागृह, चंद्रपूर  येथे  तालुका अभियान  व्यवस्थापन  कक्ष चंद्रपूर च्या वतीने आयोजन करण्यात आले होते. 

सदर कार्यशाळा  ला  कृषी सखी ,पशु सखी, CRP, CLM, CAM यांची  उपस्थिती होती.  या आर्थिक वर्षात  पशु संवर्धन विषयक करावया च्या कामांचे नियोजन व मार्गदर्शन  करण्यात आले.  सदर कार्यशाळेला मा. श्री आशुतोष सपकाळ सर, गट विकास अधिकारी,पंचायत समिती चंद्रपूर यांनी सर्व उपस्थित कॅडर ला शास्वत उपजीविका बाबत मार्गदर्शन केले. कार्यशाळेला मार्गदर्शक म्हणून लाभलेले  मा. डॉ रामटेके सर, पशुधन विकास अधिकारी,पशु संवर्धन विभाग पंचायत समिती चंद्रपूर यांनी त्यांच्या  विभागाच्या विविध योजना, वैरण विकास कार्यक्रम, कृत्रिम रेतन, लसीकरण  इत्यादी बाबी समजावून  सांगितल्या.  श्री गराड सर, CLM यांनी पशु  बाबतचे  विविध आजार व त्यावर करावयाचे उपचार, लसीकरण,  पशुधन वाढ या विषयी  मार्गदर्शन केले. श्री संघर्ष रंगारी , Org. CC यांनी  PG व्यवसाय बाबत सविस्तर मार्गदर्शन   केले.  शितल देरकर, तालुका अभियान व्यवस्थापक  यांनी चालू आर्थिक वर्षातील  उद्दिष्ठ, त्याबाबत करावयाचे नियोजन, एकत्रित खरेदी  याबद्दल मार्गदर्शन केले  तसेच उपस्थित प्रशिक्षणार्थी चे  प्रभाग निहाय गट तयार करून  उपजीविका विषय वर सादरीकरण घेण्यात आले. व शेवटी प्रशिक्षणार्थी ची परीक्षा घेण्यात आली.तसेच प्रशिक्षण कसे झाले यावर अभिप्राय घेण्यात आला. या प्रकारे उपजीविका प्रशिक्षण खूप चांगल्या पद्धतीने पार पडले. सदर कार्यशाळेला शितल देरकर (BMM) , जयश्री नागदेवते  (BM IBCB), प्रतीक्षा खोब्रागडे (BM FI), स्नेहा कोलते(BC), श्री. संघर्ष रंगारी (Org CC),श्री प्रवीण फूके, श्री सिद्धार्थ  ढोणे, श्री  भारत कळसकर, श्री रमेश खोब्रागडे  प्रभाग समन्वयक,CAM, CLM, ICRP कृषिसखी व पशु सखी उपस्थित होते.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)
Videos Photos