आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत कृषी विषयावर कार्यशाळा
May 17, 2022
0
गोंडपिंपरी : दिनांक 13/5/2022 ला पंचायत समिती सभागृह, गोंडपिपरी येथे तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष गोंडपिपरी च्या वतीने सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेला कृषी सखी ,पशु सखी,उद्योग सखी, मत्य सखी,MCRP, CLM, CAM,CFM यांची उपस्थिती होती. या आर्थिक वर्षात कृषी विषयक करावयाच्या कामांचे नियोजन व मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यशाळेला मार्गदर्शक श्री.भांडारकर सर,जिल्हा व्यवस्थापक,यांनी एकत्रित खते व बियाणे खरेदी , बियाणांची उगवण क्षमता, बीज प्रक्रिया माती परीक्षण ,शाश्वत शेती,सेंद्रिय शेती, खताचा वापर कमी करून सेंद्रिय खतांचा वापर करणे व एकात्मिक कीड व्यवस्थापण, शेड नेट,फळबाग लागवड,नर्सरी,पशू लसीकरण,गोठा व्यवस्थापन,सर्व लाभार्थी उत्पन्न वाढ व त्यांच्या नोंदी करणे इत्यादी बाबी समजावून सांगितल्या तसेच मौजा धाबा येथे PMFME अंतर्गत व्यवसायाला भेट देऊन खरेदी,विक्री ची पाहणी करून त्या व्यवसाय कसा वाढवता येईल यावर विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले,ग्राम संघाला भेट देऊन समूहाचे व ग्राम संघाचे रेकॉर्ड,ऑडिट निरीक्षण करून सूचना करण्यात आले तसेच वटरणा येथील गेडाम ताई यांच्या विटा भट्टी व्यवसायाला भेट देण्यात आली,सदर कार्यशाळेला BMM,BM-ibcb,BM-mis, प्रभाग समन्वयक,प्रभाग समन्वयक सेंद्रिय शेती उपस्थित होते.मौजा धाबा येथे व्यवसायाला भेटी दरम्यान श्री.भांडारकर सर,श्री.किशोर हिंगणे प्रभाग समन्वयक,वैशाली बिटीवार CTC,ICRP उपस्थित होते.