जिवती : तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती जिवती अंतर्गत आज दिनांक 12/05/22 ला आझादी का अमृत महोत्सव निमित्त पंचायत समिती सभागृह जिवती येथे ICRP, Mcrp,उद्योग सखी,कृषी-पशु सखी, BDSP, Mentor याची एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली.सदर कार्यशाळेत मा. काळे सर सांख्यिकी वीस्तार अधिकारी प स जिवती उदघाटक म्हणून लाभलेत आणि ग्रामपंचायत निधीत महिला निधी किती व कसे घ्यायचे या विषयी माहिती दिली. मुख मार्गदर्शक मा. पल्लवी मॅडम गोडबोले मॅडम ता कृषी अधिकारी यानी शेती पूरक शाश्वत उपजीविका, pmfme तील व्यवसाय तसेच सेंद्रिय शेती कशी लाभदायक चे विस्तृत असे मार्गदर्शन केले. तसेच अशांत चालखुरे यांनी उपजीविकेचे शाश्वत फायदे म्हणजेच शाश्वत उपजीविका, वार्षिक आर्थिक नियोजन व उत्पन्नवाढ विषयी सभेला संबोधले. थोडक्यात उजळणी म्हणून खोब्रागडे यांनी आजची परिस्थिती कॅडर समोर ठेवली. कार्यशाळेला श्री मनोज कींनाके यांनी सूत्रसंचालन केले. श्री पंकज गोटपरतीवार सर यांनी कार्यक्रम प्रस्तावना केली. श्री हरिदास आहेर यांनी आभार प्रदर्शन केले.
Post a Comment
0Comments