सोनुली येथे आठवडी बाजाराचे उदघाटन

उमेद अभियान चंद्रपूर
0

नागभिड : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती नागभीड यांच्या मार्गदर्शनातून आशिर्वाद महिला ग्रामसंघ, सोनुली(बुज.),गिरगाव-वाढोणा प्रभाग व ग्रामपंचायत सोनुली(बुज.)यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 14 मार्च 2022 रोज सोमवारला आठवडी बाजाराचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन सोहळ्याचे वेळी गावातील 19 स्वयंसहायता समूहातील महिला व गावातील नागरिक उपस्थित होते. या आठवडी बाजाराच्या माध्यमातून उत्पादक, विक्रेते व ग्राहक यांना स्थानिक बाजारपेठ उपलब्ध झाल्याबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला.


आठवडी बाजार सुरू करण्यामागचा उद्देश गावातील उत्पादीत मालाची गावात विक्री करता यावी, गावकऱ्यांचे वेळ व श्रम कमी व्हावे तसेच दळणवळणाचा खर्च कमी व्हावा हा आहे. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा.श्री.खोजरामजी मरस्कोल्हे,जि.प.सदस्य,, तळोधी-गोविंदपूर प्रभाग, उद्घाटक मा.सौ.नैनाताई गेडाम,जि.प.सदस्य,गिरगाव-वाढोणा प्रभाग, प्रमुख पाहुणे मा.सौ.सुष्माताई डोर्लीकर,अध्यक्ष,भरारी प्रभाग संघ,गिरगाव-वाढोणा प्रभाग,मा.श्री.अमोलजी मोडक, तालुका व्यवस्थापक,मा.श्री.गजाननजी गोहणे,प्रभाग समन्वयक,मा.श्री.इंद्रजीतजी टेकाम,मत्स्य व्यवस्थापक,मा.श्री.किशोरजी मेश्राम,कृषी व्यवस्थापक,मा.सौ. मंजुळाताई मस्के,सरपंच,मा.श्री.नेताजी शेंडे,उपसरपंच,मा.श्री.गजाननजी मासरकर,ग्रामसेवक,मा.श्री.प्रमोदभाऊ पुस्तोडे,अध्यक्ष,तंटामुक्त समिती,मा.सौ.आशाताई आडे व मा.सौ.उर्मीलाताई नान्हे,ग्रामपंचात सदस्य,मा.श्री.नंदुजी लोधे,पोलीस पाटील,मा.सौ.वंदनाताई लोधे,अध्यक्ष,आशिर्वाद ग्रामसंघ,मा.सौ.मंदाताई मस्के,सचिव,आशिर्वाद ग्रामसंघ,मा.सौ.कल्पनाताई मदनकर,कोषाध्यक्ष,आशिर्वाद ग्रामसंघ,मा.श्री.प्रमोदभाऊ गायकवाड,माजी सरपंच,मा.सौ.जानुकाबाई बोरकर,प्रतीष्ठीत नागरीक,मा.सौ.वंदनाताई बन्सोड,सचिव,भाग्यश्री समुह,मा.श्री.अनिलजी कांबळे,डाटा एंट्री ऑपरेटर व मा.श्री.रेशीमजी मस्के,रोजगार सेवक,उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.खोजरामजी मरस्कोल्हे,जि.प.सदस्य,, तळोधी-गोविंदपूर प्रभाग व उद्घाटक मा.सौ.नैनाताई गेडाम,जि.प.सदस्य,गिरगाव-वाढोणा प्रभाग यांनी आपल्या कारकिर्दीत उत्तम रीत्या कार्य केल्यामुळे त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन सौ.भारती गायकवाड,अंगणवाडी सेविका व प्रास्ताविक सौ.चंदाताई सुकारे यांनी केले.उद्घाटन सोहळ्याचे आभार प्रदर्शन सौ.ज्योत्स्ना बोरकर,पशु सखी यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता श्री.दिपक गायकवाड,गावातील सर्व कॅडर, ग्रामसंघ पदाधिकारी व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी मेहनत घेतली

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)
Videos Photos