गोंडपिंपरी : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्प,विकास ग्रामसंघ चेक पेल्युर यांचे द्वारे सेंद्रिय शेती गट यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 14/03/2022 ला मौजा चेक पेललुर ता. गोंडपीपरी जिल्हा चंद्रपूर येथील जि. प पटांगणात सेंद्रीय डेमो युनिट चे उद्घाटन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मा. तालुका अभियान व्यवस्थापक ममता गोडघाटे,कार्यक्रमाचे अध्यक्ष मनून उज्वल प्रभाग संघाचे अध्यक्ष मा.सौ. इंदिराताई रामगिरवार, सह उद्घाटक म्हनून विकास ग्रामसंघाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे म्हणून तालुका व्यवस्थापक मा.संतोष वाढई, आक्सापुर ग्रामपंचायत सरपंच, करंजी ग्रामपंचायत सरपंच, प्रभाग समन्वयक श्री.किशोर हिंगाने,प्रभाग समन्वयक शेद्रिय शेती श्री प्रकाश रामटेके,मार्गदर्शक मनून कृषी विस्थार अधिकारी श्री अडकिने, कृषी सहाय्यक श्री राठोड गोंडपीपरी तसेच उज्वल प्रभाग संघ पदाधिकारी व प्रभाग संघ कॅडर आणि ग्रामसंघ कॅडर उपस्थित होत. संपूर्ण मान्यवरांनी शेद्रीय शेतीचे महत्व आणि फायदे व काळाची गरज यावर विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शेंद्रीय डेमो युनिट मध्ये उपलब्ध वस्तूंना कशी बाजारपेठ उपलब्ध होईल प्रभागातील 3200 महीला किसान किती प्रमाणात सेंद्रिय शेती अवलंबून सदर वस्तूची खरेदी करेल या संपूर्ण विषयावर तालुका अभियान व्यवस्थापक यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.रामटेके सर यांनी केले तर आभार प्रदर्शन विकास ग्रामसंघाचे अध्यक्ष यांनी केले.