मूल तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष येथे आरोग्य तपासणी

उमेद अभियान चंद्रपूर
0

मुल : आज दिनांक 15 मार्च 2022 रोजी तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष मुल तथा उपजिल्हा रुग्णालय मूल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अभियानातील महिलांचे आरोग्य तपासणी करण्यात आली.   

     महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना करिता महिला सक्षमीकरण हा महत्त्वाचा विषय असून महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय असे सर्वांगीण सक्षमीकरण करण्याचे काम अभियाना मार्फतीने करण्यात येत आहे. यासाठी अभियानाच्या वतीने प्रत्येक गावात समुदाय संसाधन व्यक्ती यांच्यामार्फततिने विविध शासकीय योजनांची माहिती पोचविली जाते त्यामुळे गाव पातळीवर राबविण्यात येणाऱ्या विकासाच्या विविध योजनांमध्ये महिलांचा सक्रिय सहभाग वाढलेला आहे तसेच गावातील सर्वसामान्य महिलांना विविध योजनेचा लाभ मिळत आहे. अभियानातील कामाकरिता नेहमी तत्पर असणाऱ्या अश्या समुदाय संसाधन व्यक्ती यांचे आरोग्य चांगले असणे हे देखील आवश्यक करिता जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष मूल अंतर्गत कार्यरत सर्व समुदाय संसाधन व्यक्ती यांचे आरोग्य तपासणी करून त्यांना विविध विषयावर समपूदेशन करण्यात आला. 

सदर कार्यक्रमाला श्री. प्रकाश तुरानकर तालुका अभियान व्यवस्थापक,श्री. वसीम काझी प्रशासन व लेखा सहा, श्री.निलेश जीवनकर, ता.व्य.  कु. जयश्री कामडी , तालुका समन्वयक, श्री. स्नेहल मडावी तालुका समन्वयक, श्री. अमर रंगारी प्रभाग समन्वयक,सौ. संगीता शिंदे, प्र. स. , श्री. रुपेश आदे प्रभाग समन्वयक, श्री.मयूर भोपे, डे. ए. ऑप. ,श्री. मयूर गड्डमवार cam सौ. भावना कुंभरे, प्रभाग संघ व्यवस्थापक तसेच अभियानातील कार्यरत समुदाय संसाधन व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)
Videos Photos