सुलेझरी येथे प्रभागाच्या कार्यालयाचे उद्घाटन
March 14, 2022
0
नागभिड : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती नागभीड यांच्या मार्गदर्शनातून झेप प्रभाग संघ,पारडी-बाळापूर प्रभागाच्या कार्यालयाचे उद्घाटन सुलेझरी येथे दिनांक 10 मार्च 2022 रोज गुरुवारला करण्यात आले. उद्घाटन सोहळ्याचे वेळी प्रभागातील 24 ग्राम संघातील पदाधिकारी व कॅडर उपस्थित होते. झेप प्रभाग संघाला नागभीड-ब्रह्मपुरी महामार्गावर कार्यालय उपलब्ध झाल्याबाबत सर्व पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा.सौ.अनिताताई बावनकर,सचिव,झेप प्रभाग संघ, उद्घाटक मा.श्री.संजुभाऊ गजपूरे,जि.प.,सदस्य,पारडी-बाळापुर प्रभाग, प्रमुख पाहुणे मा.सौ.शशिकलाताई भेंडारकर,अध्यक्ष,झेप प्रभाग संघ,मा.श्री.मोहितजी नैताम, तालुका अभियान व्यवस्थापक, ता.अ.व्य.क.,पंचायत समिती, नागभीड,मा.श्री.घनश्यामजी नवघडे,पत्रकार,सकाळ वृत्तपत्र, नागभीड,मा.श्री.निकुरे सर, पत्रकार,नवभारत वृत्तपत्र, नागभीड व मा.श्री.बोदेले सर,पत्रकार,नवभारत वृत्तपत्र, नागभीड उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन श्री.अमोल मोडक,तालुका व्यवस्थापक व आभार प्रदर्शन कु.ज्योती साळवे, प्रभाग समन्वयक यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता श्री.शुभम देशमुख,श्री.गजानन गोहणे,श्री.दिपक गायकवाड श्री.स्वप्निल गिरडकर,श्री. नंदकिशोर डहारे,श्री.इंद्रजीत टेकाम,श्री.किशोर मेश्राम,4 प्रभागातील प्रभागसंघ पदाधिकारी, ग्रामसंघ पदाधिकारी व प्रभागातील कॅडर यांनी मेहनत घेतली