चंद्रपूर : उमेद -महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने दिनांक ४ मार्च २०२२ रोजी कन्नमवार सभागृहात जिल्हास्तरीय व्यावसायिक कार्यशाळा घेण्यात आली. यात विविध विभागांसोबत कृतीसंगम तसेच मार्केट मिरची या संकेतस्थळाच्या माध्यमातून बचतगटांना विक्री व्यवसायाच्या संधी यावर मार्गदर्शन करण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी मीताली शेठी, माजी सनदी अधिकारी
सतीश अग्निहोत्री, मार्केट मिरची डॉट कॉमच्या प्रगती गोखले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी
अधिकारी वर्षा गौरकर उपस्थित होत्या. स्वयंसहायता समुहांना विपणनाच्या संधी उपलब्ध
हेाणे गरजेचे आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे. स्मार्ट फोनच्या
माध्यमातून अनेक संधी उपलब्ध होत आहे. त्याचा प्रभावी वापर आवश्यक असल्याने त्यांनी
मत व्यक्त केले. याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिलनाथ कलोडे यांनी मनरेगा कामामधून
उपजिविकेच्या संधी, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत धोंगडे यांनी स्वयंसहायता
समुहातील महिलांचे वित्तीय समावेशन, आरसेटी संचालक यांनी स्वयंसहायता समुहांकरीता प्रशिक्षण
व स्वयंरोजगार विषयी सविस्तर मार्गदर्शन केले, तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ अनिल रामटेके
यांनी पशुसंवर्धनविषयी माहिती दिली. यानिमित्त विविध उत्पादनांची प्रदर्शन घेण्यात
आले.
मार्केट मिरची डॉट कॉमच्या प्रगती गोखले यांनी ऑनलाईन
पदधतीने उत्पादीत वस्तूंची नोंद करुन राज्य तसेच राज्याबाहेरील खरेदीदारांशी कसा संपर्क
करायचा, याचे प्रात्याक्षिक सादर केले. स्वयंसहायता समुहांच्या वेगवेगळया उत्पादनांची
मागणी आहे. मात्र, विक्रेता आणि ग्राहक यांची सांगड घालणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त
केले.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जिल्हा अभियान व्यवस्थापक
मनोहर वाकडे, जिल्हा व्यवस्थापक गजानन ताजने, रोशन साखरे, गजानन भिमटे, नरेंद्र नगराळे,
आयआयटीच्या प्रशिक्षणार्थी अंकिता राठोड, तालुका व्यवस्थापक शितल देरकर, प्रतिक्षा
खोब्रागडे, प्रवीण फुके यांनी सहकार्य केले. कार्यशाळेचे संचालन तालुका व्यवस्थापक
जयश्री नागदेवते, तर आभार प्रवीण भांडारकर यांनी मानले.
कार्यशाळेला तालुका व्यवस्थापक यांच्यासह प्रभागसंघ
अध्यक्षा, समुहांच्या महिला उपस्थित होत्या.