त्याचप्रमाणे "महाजीविका अभियान" शुभारंभ कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. सदर कार्यशाळे करिता अध्यक्ष म्हणून मा.श्री.खोजरामजी मरस्कोल्हे,जि.प.सदस्य,तळोधी- गोविंदपुर प्रभाग, उद्घाटक मा.श्री. प्रफुल्लजी खापर्डे,सभापती, पंचायत समिती, नागभीड, प्रमुख पाहुणे मा.सौ. नैनाताई गेडाम,जि.प.सदस्य,गिरगाव-वाढोणा प्रभाग, मा.सौ.पेंदाम मॅडम,पं.स.सदस्य,तळोधी गण, मा.सौ.प्रणालीताई खोचरे, गट विकास अधिकारी, पंचायत समिती, नागभीड, मा.श्री.धुर्वे सर, विस्तार अधिकारी(पं),मा.सौ.श्वेता राऊत, विस्तार अधिकारी(पं), मा.श्री. हेमंतजी लांजेवार,सरपंच,ग्रा.पं.उश्राळमेंढा, मा.श्री.कमलाकरजी ठवरे,सरपंच,ग्रा.पं.बाळापूर खुर्द, मा.श्री.गणेशजी गड्डमवार,सरपंच,ग्रा.पं.मिंडाळा,मा.श्री.अमोलजी बावनकर,सरपंच,ग्रा.पं.येनोली माल, मा.श्री.रमेशजी घुग्गुसकर,सरपंच,ग्रा.पं.कन्हाळगाव, मा.श्री.सितारामजी मडावी,सरपंच,ग्रा.पं.चिखलगाव व मा.श्री.मोहितजी नैताम,तालुका अभियान व्यवस्थापक,ता.अ.व्य.क., पंचायत समिती, नागभीड उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.अमोल मोडक, तालुका व्यवस्थापक व संचालन सौ.माधुरी कोरे,लिपीका,लक्ष प्रभाग संघ,मौशी-कांपा प्रभाग यांनी केले.
कार्यशाळेदरम्यान 36 ग्रामपंचायतला फाँगिंग मशीन,3 तंटामुक्त समिती,27 स्वयं सहायता समूह व महीला ग्रामसंघ यांना दरी वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्याचबरोबर यूट्यूब लिंक वर उपस्थित कॅडरला महाजीविका अभियान राज्यस्तरीय शुभारंभ तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामीण महिलांचा गौरव सोहळा दाखविण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता पंचायत समिती,नागभीड व तालुका अभियान व्यवस्थापन कक्षातील सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.