यामधे ग्रामपंचायतच्या करपट्टी वसूली, बाजार करवसूली, कचरा व्यवस्थापन, पाणी शुध्दीकरण व पुरवठा, इत्यादी उत्पन्नाचे साधन, त्याकरिता येणाऱ्या अडचणी व उपाययोजना यावर चर्चा करण्यात आली. यावेळी सौ. मंदाताई बाळबुध्दे सभापती पंचायत समिती सिंदेवाही व मा. संजय पूरी गटविकास अधिकारी यांनी सहभागी होऊन मार्गदर्शन केले तसेच विषय व चर्चा सत्र हे स्तुत्य उपक्रम असल्याचे मत मांडले. यानंतर तालुक्यात प्रत्यक्ष उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले. चर्चासत्रात श्री ताजने सर व श्री साखरे सर जिल्हा व्यवस्थापक यांनी मार्गदर्शन केले. यामधे समन्वयक म्हणून विवेक नागरे, तालुका अभियान व्यवस्थापक यांनी काम पाहिले.
सिंदेवाही येथे महसुल संकलनावर ज्ञानवर्धन कार्यशाळा
March 06, 2022
0
सिंदेवाही: येथील पंचायत समिती सभागृहात ग्रामपंचायत करवसुली माध्यमातून ग्रामसघाचे आर्थिक स्त्रोत बळकट करणे या विषयावर दिनांक 2 मार्च 2022 रोजी ज्ञानवर्धन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यात ब्रम्हपुरी, नागभिड, चिमूर, मुल, कोरपना, पोभूर्णा येथील तालुका व्यवस्थापक, प्रभाग समन्वयक सहभागी झाले होते.