एकत्रित खरेदी-विक्री विषयावर ज्ञानवर्धन कार्यशाळा
March 06, 2022
0
चंद्रपूर :- स्वयंसहायता समूहांना आर्थिकदृष्ट्या बळकट होण्यासाठी एकत्रित खरेदी-विक्री हा उपक्रम अतिशीत फायदेशीर असून या उपक्रमाच्या विस्तारीकरनाची संभाव्य शक्यता तपासून पाहण्यासाठी तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती मूल येथे एक दिवसीय ज्ञानवर्धन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले . महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या जिल्हा कक्षाच्या ज्ञान व्यवस्थापन शाखेकडून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 23 फेब्रुवारी 2022 रोजी तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, मुल येथे समुदाय संचालित प्रशिक्षण केंद्रात एकत्रित खरेदी-विक्री उपक्रमातील नाविन्यपूर्ण प्रयोग आणि संभाव्य विस्तारीकरण या विषयावर ज्ञानवर्धक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाची मूल तालुक्यात तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाने अनेक गावात प्रभावीपणे अंमलबजावणी केली असून अनेक ग्रामसंघ , उत्पादक संघ या उपक्रमाच्या माध्यमातून 5 लाखाच्या वर उलाढाल केली आहे स्थानिक गरजा ओळखून अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले आहे यात एकत्रित खरेदी-विक्रीच्या उपक्रमात मूल तालुक्यात एकत्रितपणे धान, तूर, मिरचीची खरेदी केली जात आहे एकत्रित किराणा खरेदी करून समूहातील सदस्यांना दिला जात आहे. कार्यशाळेचे समन्वयक मुल कक्षाने केले असून या विषयावर सविस्तर सादरीकरण केले या उपक्रमांचे इतर तालुक्यात विस्तारीकरनास अनेक संधी असल्याचे विचारमंथनातून दिसून आले या कार्यशाळेत तालुका अभियान व्यवस्थापक ग्राम संघाचे पदाधिकारी तालुका व्यवस्थापक प्रभाग समन्वयक सहभागी झाले होते. प्रामुख्याने मा. गजानन ताजने सर ( जिल्हा व्यवस्थापक ), मा. प्रवीण भांडारकर सर ( जिल्हा व्यवस्थापक ), मा. नरेंद्र नगराडे सर ( जिल्हा व्यवस्थापक ) उपस्थित होते.