राजूरा : दिनांक 03 मार्च 2022 ला तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, राजुरा अंतर्गत आर्वी - पाचगाव प्रभागातील मंगी वू. येथे क्रांती महिला ग्रामसंघ व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आठवडी बाजाराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी गावातील एकूण 9 समूहातील तसेच आजूबाजूच्या गावातील 7 समूहातील महिलांनी विविध वस्तू आणि माल विक्रीस आणला. त्यात भाजीपाला, कापड दुकान, शूज व चप्पल, किराणा, स्टेशनरी, ई. दुकानातून मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात आली. या आठवडी बाजाराच्या माध्यमातून उत्पादक, विक्रेते आणि ग्राहकांना स्थानिक बाजारपेठ उपलब्ध झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून मा. डॉ रजनीताई हजारे, महीला समाजसेविका बल्लारपूर, प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री किरणकुमार धनवडे सर, संवर्ग विकास अधिकारी पं. स.राजुरा मा.श्री.सपकाळ, संवर्ग विकास अधिकारी पं.स.चंद्रपूर, मा.श्री विठ्ठल माकपल्ले, कृषी अधिकारी राजुरा, मा. श्री कुंभारे सर, अंबुजा फाऊंडेशन, मा.संध्या डोंगरे मॅडम, तालुका अभियान व्यवस्थापक, मा. पडवे मॅडम, तालुका व्यवस्थापक, मा.भडके सर, तालुका व्यवस्थापक, मा. नगराळे सर, तालुका व्यवस्थापक तसेच मा. श्री.तोडसाम सर, अध्यक्ष ग्राम विकास समिती मा. श्री. पुसाम सर, माजी जिप सदस्य, मा. वंजारी, ग्रामपंचायत सचिव, मा. परचाके सर, गटशिक्षणाधिकारी, मा भेंडे सर मुख्याध्यापक, मा. चाफले सर, माजी उपसरपंच, ग्रामसंघ पदाधिकारी, अंगणवाडी सेविका, पशू कृषी, बँकसखी, अमित भगत उपस्थित होते.