बल्लारपूर : दिनांक 16/3/2022 बुधवार रोज बल्लारपूर येथील कळमना या गावात आठवडी बाजारचे उद्घाटन करण्यात आले. सदर बाजार पेठेत एकूण ६३ समूहातील महिला, शेतकरी समूह, तसेच गाव स्तरावरील व्यक्ती उपस्थित होत्या. सदर बाजारपेठेत भाजीपाला, कंदमुळे, फळे, मसाले, कडधान्य, स्टेशनरी, कपड्याचे दुकान, ऊस रस, शीतपेय, खाद्यपदार्थ, इत्यादी वस्तूची बाजारपेठ भरवण्यात आली सदर बाजारपेठेला अतिशय भरभरून असा प्रतिसाद मिळाला.
सेवार्थ,उमंग,संघम,ग्रामसंघ,ग्रामपंचायत कळमना यांच्या संयुक्त विदयमाने झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटक मा.संजय राईनचवार, तहसीलदार, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. वैशालीताई बुद्धलवार, जि.प.सदस्य,तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. इंदिरा ताई पिपरे (माजी सभापती प.स.बल्लारपूर),मा. थिपे साहेब(वनपरिक्षेत्र अधिकारी बल्लारपूर),मा. सोमेश्वर पदमगिरीवार (माजी उपसभापती प. स.बल्लापूर), मा. हरिशभाऊ गदाम (जी.प.सदस्य), मा. मा.मनोहर वाकडे सर (DMM), मा. गजानन ताजने सर (DMKM), माननीय प्रवीण भांडारकर सर (DM-MIS), सौ.सरला परेकर (सरपंच कळमना),मा. श्री .रुपेश पोडे (उपसरपंच कळमना),श्री विलास तेलमासरे (ग्रामसेवक कळमना ग्राप),मा. सौ.नंदाताई उमरे (पोलीस पाटील कळमना), सर्व ग्रामपंचायत सदस्य,महिला ग्रामसंघ व प्रभागसंघ कोठारी पाळसगाव अध्यक्ष , सचिव , कोषाध्यक्ष उमेद उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन राफीका कुरेशी ताईनी केले.
प्रास्ताविक संतोषी उमक (ता.अ.व्य.) यांनी केले. आभार पंकज गणवीर (प्रभाग समन्वयक - सेंद्रिय शेती) यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करिता सुकेशनी गणवीर (प्रभाग समन्वयक), अध्यक्ष , सचिव , कोष्ध्यक्ष, लीपिका ग्रामसंघ सर्व कळमना , सर्व icrp ताई, बँक सखी यांनी सहकार्य केले.