उमेद च्या महिला उद्योगीनींचा “सरस्वती मसाले उद्योग” उद्घाटनीय सोहळा
January 13, 2022
0
नागभिड( 13 जाने.) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती नागभीड अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग(PMFME) योजने द्वारा आर्थिक सहाय्यता प्राप्त सरस्वती महिला स्वयं सहायता समूह, वाढोणा यांचा “सरस्वती मसाले उद्योग” उद्घाटनीय सोहळा दिनांक13 जानेवारी 2022 ला पार पडला.स्वयंसहायता समूहाला व त्यातील महिलांची आर्थिक उन्नती व्हावी तसेच त्यांची उपजीविका वृद्धी होऊन कुटुंबाचा स्तर उंचावेल या उदेशाने शासनातर्फे व्यवसाय करणे करिता निधी दिल्या जात आहे.त्या माध्यमातून महिला व्यवसायिक बनल्या. आता प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या योजनेच्या माध्यमातून महिला उद्योजिका व्हाव्या या करिता आर्थिक पाठबळ दिल्या जात आहे. सरस्वती समूहातील महील यांनी मसाले व्यवसाय करण्याचा दृढ निश्चय केला व व्यवसाय सुरु केला त्यातच त्यांना PMFME द्वारे 4 लक्ष रुपये कर्ज स्वरुपात प्राप्त झाले. त्यांचा “ सरस्वती मसाले उद्योग” या नावाने आज गट विकास अधिकारी प्रणाली खोचरे यांच्या शुभ हस्ते तर देवेंद्रजी गेडाम, सरपंच ग्रामपंचायत वाढोणा यांच्या अध्यक्षतेत व तालुका अभियान व्यवस्थापक मोहित नैताम यांच्या मार्गदर्शनात सदर व्यवसायाचा उद्घाटन समारंभ कोविड च्या सर्व नियमाचे पालन करून पार पडला.या प्रसंगी गट विकास अधिकारी प्रणाली खोचरे यांनी सदर समूहातील उद्योगिनी महिलांना शुभेच्छा दिल्या व इतर समूहांना उद्योजक होण्या सदर्भात मार्गदर्शन केले. महिला उद्योजीकांच्या विविध वस्तूंना तालुकास्तरावर मार्केटिंग साठी राणी हिराई तालुका विक्री केंद्राची स्थापना केलेली आहे व पुन्हा या बाबतीत कोणतीही गरज भासल्यास मी सदैव आपल्या मदतीला तयार आहे अशी ग्वाही दिली. सदर उद्घाटन सोहळ्या करिता प्रमुख पाहुणे म्हणून भगवानजी बन्सोड, उपसरपंच, ग्रामपंचायत वाढोणा, रेश्माताई सडमाके,मिनाक्षीताई कोटावर, सदस्य, ग्रामपंचायत वाढोणा, सुषमाताई डोर्लीकर, अध्यक्ष, व शारदाताई बोरकर, सचिव उडाण प्रभाग संघ, गिरगाव-वाढोणा प्रभाग उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन तालुका व्यवस्थापक अमोल मोडक व प्रास्ताविक तालुका अभियान व्यवस्थापक मोहित नैताम तर आभार सरस्वती समूहाच्या सदस्या संगिता गहाणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता तालुका व्यवस्थापक आमिर खाँन, प्रभाग समन्वयक दिपक गायकवाड, गजानन गोहणे, समूह संसाधन व्यक्ती.साधणा बोरकर, मंगला बोरकर, कृषी सखी रागिनी बोरुले व मत्स्य सखी वृषाली शेंडे यांनी प्रयत्न केले.