चंद्रपूर : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष चंद्रपूर च्या वतीने दिनाक १४/०१/२०२२ पंचायत समिती चंद्रपूर च्या विविध प्रकारचा संक्रात विशेष वस्तू दिवसीय प्रदर्शन व विक्री महोत्सव भरविण्यात आलेले आले.
सदर मकर संक्रांत विशेष विक्री महोत्सवचे उद्घाटन मा. केमा रायपुरे, सभापती पंचायत समिती चंद्रपूर यांच्या हस्ते करण्यात आले. मा. आशुतोष सपकाळ सर, गट विकास अधिकारी, पंचायत समिती चंद्रपूर, सर्व पंचायत समिती चे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष चंद्रपूर चे मा.गजानन ताजने, जिल्हा व्यवस्थापक मार्केटिंग उपस्थित होते.
सदर कार्यक्रम चे नियोजन शितल देरकर, तालुका अभियान व्यवस्थापक यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतीक्षा खोब्रागडे, तालुका व्यवस्थापक आर्थिक समावेशन, जयश्री नागदेवते तालुका व्यवस्थापक संस्था बांधणी व क्षमता बांधणी, प्रवीण फुके, प्रभाग समन्वयक, सिद्धार्थ ढोणे, प्रभाग समन्वयक, भारत कळसकर प्रभाग समन्वयक, सोनम जांभूळकर समुदाय कृषी व्यवस्थापक, समूह संसाधन व्यक्ती, समूहातील महिला नी मोलाचे सहकार्य केले. सदर मकर संक्रांत विशेष विक्री महोत्सव शासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करून कार्यक्रम घेण्यात आला. विक्री महोत्सवाला ग्राहका चा खूप छान प्रतिसाद मिळाला.