महिलांनी उद्योजक बनावे:- मा. चंदूभाऊ मारगोणवार

उमेद अभियान चंद्रपूर
0

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष मूल येथिल स्थापन करण्यात आलेल्या यशस्वी आदर्श प्रभागसंघ , चिरोली यांचे समुदाय स्तरीय  प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन प्रसंगी महिलांनी पुरुषाप्रमाणे आर्थिक प्रगती करावी व उद्योजक व्हावे असे प्रतिपादन मा. चंदूभाऊ मारगोणवार, सभापती पंचायत समिती मुल यांनी केले.

   आज दिनांक 11 ऑक्टोबर 2021 ला उमेद अभियान अंतर्गत जिल्ह्यातील प्रथमच असे समुदाय स्तरीय  प्रशिक्षण केंद्र, मूल चा शुभारंभ मा.चंदूभाऊ मारगोणवार सभापती, पंचायत समिती मुल

मा. सौ. जयश्रीताई वलकेवार उपसभापती,पंचायत समिती मुल, सौ. पूजाताई डोहने , सदस्य , पंचायत समिती मुल तसेच मा. मयूर कळसे संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती मुल  यांचे हस्ते करण्यात आला.

अभियानांतर्गत विविध प्रशिक्षण मोठ्या प्रमाणात घेतले जात असून सदर प्रशिक्षण आपल्याच अभियानामार्फत व्हावे यातून प्रभागसंघाचे आर्थिक उत्पन्न वाढेल यासाठी या समुदाय स्तरीय प्रशिक्षण केंद्राची संकल्पना अंमलात आली. उद्धाटन प्रसंगी पंचायत समितीच्या आवारात  ग्रामीण भागातील विविध वस्तूंचे विक्री प्रदर्शन करण्यात आले. यावेळी मा.चंदुभाऊ मारगोणवार सभापती पंचायत समिती मुल म्हणाले स्थापन करण्यात आलेल्या प्रशिक्षण केंद्राला अभियानापूर्ती मर्यादित न ठेवता विविध योजनेच्या प्रशिक्षण साठी केंद्र उपलब्ध करून दिले तर  याचे वटवृक्षात रूपांतर होण्यास वेळ लागणार नाही. व मोठ्या नावारूपास येईल असे प्रास्ताविकेत सौ. स्वातीताई आयलनवर, अध्यक्ष यशस्वी प्रभाग संघ, चिरोली यांनी सांगितले. 

सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सौ. सुवर्णा आकनपल्लीवार अध्यक्ष तुलशी प्रभाग संघ बेंबाळ, सौ. आरिफा भसारकर अध्यक्ष वृंदावन प्रभाग संघ डोंगरगाव, प्रकाश तुरानकर तालुका व्यवस्थापक,  निलेश जीवनकर तालुका व्यवस्थापक,  जयश्री कामडी तालुका समन्वयक, स्नेहल मडावी तालुका समन्वयक, वसीम काझी प्रशासन व लेखा सहाय्यक, अमर रंगारी प्रभाग समन्वयक, हेमचंद बोरकर प्रभाग समन्वयक, रुपेश आदे प्रभाग समन्वयक, मयूर भोपे, गिरीधर चरडुके, मयूर गड्डमवार CAM, भावना कुमरे उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रभागसंघातील पदाधिकारी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)
Videos Photos