जीवनोन्नती प्रभागसंघा मार्फत सामूहिक किराणा खरेदी व विक्री

उमेद अभियान चंद्रपूर
0

 

पोंभूर्ना:- उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला सक्षमीकरण व शाश्वत उपजीविका निर्माण करण्यासाठी तालुक्यात कार्य करीत आहे.यासाठी गाव स्तरावर स्वयं सहाय्यता समूह, ग्रामसंघ व प्रभाग संघाची निर्मिती करण्यात आलेली आहे.यांच्या माध्यमातून महिला सक्षम होवू पाहत आहेत. तसेच अभियानाने जी निधी उपलब्ध करून दिलेला आहे तिथून समूह,ग्राम संघ व प्रभाग संघ यांनी आपले आर्थिक उत्पन्न वाढवावेत यासाठी नियमित तसेच हंगाम नुसार विविध उपक्रम राबवून उत्पन्नात वाढ करायची आहे. त्यासाठी दसरा व दिवाळी सणाचे औचित्य साधून प्रभाग संघा मार्फत सामूहिक किराणा खरेदी विक्री उपक्रमाचे उद्घाटन मा. कू. अल्काताई आत्राम सभापती, श्रीमती सुनीता मरस्कोल्हे गट विकास अधिकारी यांच्या हस्ते रिबीन कापून करण्यात आले. गट विकास अधिकारी यांनी महिलांना उंच भरारी घेवून स्वावलंबी व्हावेत या बाबत मार्गदर्शन केलेत. तसेच सभापती मॅडम यांनी सुद्धा महिला सक्षम होवून स्वतःचा व्यवसाय सुरू केल्याचे पाहून समाधान व्यक्त केले.ही महिलांची शक्ती असून महिला आता पुरुषांच्या बरोबरीने व्यवसायात येत असल्याचे हीच उमेद अभियानाची फल निष्पती असल्याचे आवर्जून नमूद केले.

सदर कार्यक्रमाला गावातील प्रथम नागरिक सरपंच सो.वाकुडकर ताई प्रभाग संघाचे अध्यक्ष,सचिव व कोषाधक्ष्य ताई उपस्थित होत्या.तसेच तालुका अभियान व्यवस्थापन कक्षा तील सर्व कर्मचारी व कॅडर उपस्थित होत्या.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)
Videos Photos