चंद्रपूर : महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग,एमएसआरएलएम (उमेद)चंद्रपूर व दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना(DDUGKY) यांचे सयुक्त विद्यमाने दिनांक 24/10/2021 रविवारला ठीक 12:00 वाजता विकास केंद्र जिल्हा स्टेडीयम जवळ चंद्रपुर येथे विशेष मोबलाँयझेशन कँम्प( मेळावा) एससी/एसटी/अल्पसंख्यांक प्रवर्गातील लाभार्थ्यासाठी आयोजित करण्यात आला. त्यासाठी जिल्हाभरातील 92 बेरोजगार युवक –युवतींनी या कौशल्या रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.लाभार्थी उमेदवारांसाठी सोलर टेक्निशिअन या ट्रेड चे तिन महिण्याचे प्रँक्टीकलसह निवासी प्रशिक्षण यूथ वेलफेअर संस्थेमार्फत नागपुर येथे दिल्या जाणार आहे.प्रशिक्षणानंतर 100% जाँब प्लेसमेंट दिल्या जाणार आहे ज्यात नौकरीदाता संस्थेकडून अदांजीत किमान पगार 10000/- ते 12000/-असणार आहे.आणि प्रशिक्षण प्राप्त उमेदवाराने सोबतच स्वता एजंसी घेतल्यास 30% कमिशन वेगळ्याने राहणार आहे. ग्रामीण रोजगार हमी कामावरील कुटुंबा(मनरेगा लाभार्थी) मधिल उमेदवारांना यात विशेष प्राधान्य दिल्या जाणार आहे. योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन श्री.नरेंद्र डी. नगराळे - जिल्हा अभियान व्यवस्थापक(उमेद) तर प्रशिक्षणाबाबत प्रकल्प कार्यान्वयन संस्थेतर्फे श्री विजय टाके यांनी उपस्थित लाभार्थी व त्यांचे पालकांना केले. याप्रसंगी उमेद चंद्रपुर पंचायत समिति कक्षातर्फे प्रभाग समन्वयक सिद्धार्थ ढोणे यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सहकार्य केले.
Post a Comment
0Comments