सिंदेवाही : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पंचायत समिती सिंदेवाही अंतर्गत आदर्श ग्रामसंघ लोणवाही यांनी दिवाळी फराळ साहित्य प्रदर्शनी व विक्री स्टाल सिंदेवाही येथे सुरू करण्यात आले. यात चिवडा,चकली, लाडू, शेव, बालुशाही, इत्यादी फराळाचे साहित्य ऑर्डर प्रमाणे करून मिळणार, सदर उद्घाटन वेळी मा. सौ मंदाताई बाळबुद्धे सभापती प.स. सिंदेवाही, मा. श्री संजय पुरी गट विकास अधिकारी प. स. सिंदेवाही श्री रणधीर दुपारे प.स. सदस्य ,श्री घाटोळे स. ग. वि. अ. उपस्थित व श्री विवेक नागरे BMM, श्री उद्धव मडावी BM, श्री संदीप उईके, सौ सविता उईके प्रभाग समन्वयक
व ग्रामसंघातील महिलांची उपस्थिती होती.
Post a Comment
0Comments