मूल : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्प , राजमाता जिजाऊ व नवदुर्गा महिला ग्रामसंघ यांच्या द्वारे संकल्प स्थानिक सेंद्रिय गट यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 18 आक्टोबर 2021 ला मौजा चिचाळा ता मूल जिल्हा चंद्रपूर येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे सेंद्रिय डेमो युनिटचे उद्घाटन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून श्री.प्रशांत भाऊ गट्टूवार ग्रा. प. सदस्य चिचाळा , कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सौ . जस्मिता लेनगुरे सरपंच चिचाळा तसेच प्रमुख पाहुणे मार्गदर्शक म्हणून मा. गायकवाड सर तालुका कृषी अधिकारी मूल , मा. देशमुख सर कृषी विस्तार अधिकारी , मा. पेटकर सर कृषी विस्तार अधिकारी पंचायत समिती मुल,मा जाधव मॅडम कृषी सहाय्यक, श्री. मंगर सर ग्रामविकास अधिकारी , सौ. चौधरी मॅडम वनरक्षक, मा. दिवाकर ननेवार , मा . संजय गेडाम वन समिती अध्यक्ष तसेच यशस्वी प्रभागसंघ पदाधिकारी उपस्थित होते.
श्री गायकवाड सर यांनी मार्गदर्शन करताना शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ कसा मिळवता येईल यावर सविस्तर असे मार्गदर्शन केले. श्री. मा. वाकडे सर जिल्हा अभियान व्यवस्थापक यांनी मार्गदर्शन करतांना शेतीतील उत्पादित मालावर प्रक्रिया करून त्यापासून जास्तीत जास्त फायदा कस करता येईल याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले तसेच मा. साखरे सर जिल्हा व्यवस्थापक यांनी अभियान अंतर्गत सुरू असलेले व्यवसाय विषयक मार्गदर्शन केले . संकल्प स्थानिक गट चिचाळा अंतर्गत प्रभागातील शेतकऱ्यांना सेंद्रिय निविष्ठा उदा. गांडूळ खत, कंपोस्ट खत, लेंडी खत, घनजीवामृत, अजोला, दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क, जीवामृत, वेस्ट डी कंपोजर, दही अर्क, ब्रह्मास्त्र, अग्नीअस्त्र, उपलब्ध करून दिल्या जाईल असे मार्गदर्शन केले.
श्री देशमुख सर यांनी सेंद्रिय डेमो युनिट मध्ये उपलब्ध वस्तूंना कसा बाजारपेठ मिळवता येईल या संदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले.
श्री पेठकर सर यांनी सेंद्रिय निविष्ठा या जागतिक स्तरावर कशाप्रकारे पोहोचता येईल उदा. ॲमेझॉन फ्लिपकार्ट यावर मार्गदर्शन केले.
तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष मुल येथून मा. सुमटकर मॅडम तालुका अभियान व्यवस्थापक , मा.निलेश जीवनकर तालुका व्यवस्थापक, मा. स्नेहल मडावी तालुका समन्वयक (शेंद्रीय शेती), मा. रुपेश आदे प्रभाग समन्वयक (सेंद्रिय शेती) सौ . संगीता शिंदे मॅडम प्रभाग समनव्यक , मा. मयूर गड्डमवार कृषी व्यवस्थापक, सौ . भावना कुमरे प्रभागसंघ व्यवस्थापक , उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन सौ. रंजना सोनटक्के ICRP यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.ज्योती आंबोरकर उद्योगसखी तर उपस्थितांचे आभार सौ. मीनाक्षी बुरांडे ताई यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता दुर्गा गेडाम , सौ. सोनी लेनगुरे, स्थानिक ग्रुप मधील सदस्य व राजमाता जिजाऊ , नवदुर्गा महिला ग्रामसंघ सर्व सदस्य यांनी सहकार्य केले.