एकाचवेळी उमेदच्या 3 हिराई मार्टचे उदघाटन

उमेद अभियान चंद्रपूर
0

 ग्रामीण महिलांचे उत्पादने खरेदीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांचे आवाहन

चंद्रपूर, (दिनांक 26 जानेवारी 2021) : ग्रामीण भागातील स्वयंसहायता समुहांच्या महिलांना रोजगार मिळावा तसेच स्थानिक उत्पादनां बाजारपेठ मिळावी यासाठी 26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद परिसर, पंचायत समिती ब्रम्हपूरी येथे हिराई रुरल मार्ट, तर बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव पोडे येथे घरकुल मार्टचे  मान्यवरांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद अंतर्गत जिल्हयात सुमारे 18 हजार स्वयंसहायता समुह कार्यरत आहे. अभियानाने दिलेल्या प्रशिक्षणामुळे शेतीसह अनेक समुह छोटया उदयोगांकडे वळले आहेत.   यात स्थानिक स्तरावरील संसाधने वापरुन खाद्य श्रेणीतील पदार्थ, शोभीवंत वस्तु आदी तयार केल्या जात आहेत.   या उत्पादनांना उमेद अभियानाकडून 'हिराई' या नावाने बाजारात आणले जात आहे. 26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर येथील मार्टचे उदघाटन जि.प. अध्यक्ष संध्याताई गुरनुले यांनी केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अभियान सहसंचालक श्री. शंकर किरवे, उपाध्याक्ष रेखा कारेकर, सभापती नागराज गेडाम, सभापती  सुनील उरकुडे, सभापती राजू गायकवाड उपस्थित होते. हिराई रुरल मार्टमध्ये विविध प्रकारचे लोणचे, विविध प्रकारचे मसाले, सेंद्रीय तांदूळ, कलाकुसरीच्या वस्तू, पापड, महिलांनी परिधान करावयाचे हातांनी तयार केलेले दागिने आदी वस्तू उपलब्ध आहेत.

 तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष  ब्रम्हपुरी तर्फे पंचायत समिती येथील हिराई रूरल मार्टचे उदघाटन पंचायत समिती सभापती दोनाडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसभापती ठवरे, संवर्ग विकास अधिकारी इल्लुरकर, भस्मे मॅडम, तालुका अभियान व्यवस्थापक जांभूळकर व उमेद कर्मचारी उपस्थित होते.

तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष  बल्लारपूर यांच्या वतीने  नांदगाव पोडे येथील आनंद ग्रामसंघाद्वारे संचालित घरकुल मार्ट चे उदघाटन मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले. या मार्टमध्ये सिमेंट, लोखंड व घरकुलास उपयोगी सर्व वस्तू किफायतशीर दरात उपलब्ध असणार आहे. याप्रसंगी सभापती इंदिराताई पिपरे, गटविकास अधिकारी श्री. कळसे, प्रशासक श्री पदमगिरीवार, जि.प. सदस्य हरीश गेडाम तसेच श्री. गोविंदा पोडे, माजी सभापती, प्रभागसंघ अध्यक्ष सौ. प्राची कोंडगुरला, श्री. मोझरकर उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वितेसाठी सौ. माधुरी मुके, , तालुका अभियान व्यवस्थापक उमप, श्री. माउलीकर, सुकेशीनी गणवीर  यांनी सहकार्य केले.

या कार्यक्रमांच्या औचित्याने जिल्हा परिष्द अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामीण भागातील महिलांनी केलेल्या उत्पादनांची खरेदी करुन त्यांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन केले आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)
Videos Photos