चंद्रपूर, ता. 16 : घरकुल तसेच इतरही बांधकामाकरीता लागणारे सर्व साहित्य एकाच छताखाली मिळावे या उदेशाने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपुर यांचे संकल्पनेतून राबविण्यात आलेले “ घरकूल मार्ट ” ला पंचायत समिती चंद्रपूर अतंर्गत चिचपल्ली येथे सुरूवात करण्यता आली. चिचपल्ली येथे रमाई ग्रामसंघाच्या घरकूल मार्टचा दिनांक 15/02/2021 रोजी थाटात शुभारंभ करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अतंर्गत तालूका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती चंद्रपूर यांच्या कार्यक्षेत्रातील रमाई ग्रामसंघ मागील तीन वर्षा पासून कार्यरत आहे. या उदघाटनप्रसंगी उदघाटक म्हणून श्री गौतम निमगडे तसेच पंचायत समिती सभापती श्री. केमा रायपूर, गट विकास अधिकारी श्री. विजय पेदांम , सहा. गट विकास अधिकारी श्री. आशूतोष सपकाळ, प्र. सहा.प्रकल्प संचालक श्री. प्रणव बक्षी , जिल्हा व्यवस्थापक श्री. प्रविण भांडारकर, ग्रामसंघ अध्यक्ष प्रेमिला तामटकर, प्रभाग समन्वयक श्री.प्रविण फुके व गावातील समूहाच्या मोठया प्रमाणात महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन तालूका अभियान व्यवस्थापक कु. जयश्री नागदेवते यांनी केले.