मुल तालुक्यात उमेद उद्योग केंद्राचे उद्घाटन

उमेद अभियान चंद्रपूर
0

 

मूल : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत तालुका व्यवस्थापन कक्ष मूल येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्प अंतर्गत उमेद उद्योग केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

स्वयंसहायता समुह तसेच सहभागी महिलांना नवीन छोटे उद्योग तयार करता यावे तसेच जुन्या उद्योगांना बळकटी देता यावी, यासाठी मूल तालुक्यातील प्रभागसंघाच्या नियंत्रणात उद्योग विकास केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्र्रातून सुक्ष्म लघु उद्योगांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या केंद्राचे उद्घाटन चंदूभाऊ मारगोनवार, सभापती, पं. .मूल यांचे हस्ते तसेच घनश्याम जुमनाके, उपसभापती, पं. .मूल यांच्या उपस्थितीत करण्यात आले. नवीन उद्योगांसाठी व्यवसाय संकल्पना आणि विद्यमान उद्योगांना वाढीचे मार्गदर्शन करणे, व्यवसाय सुरू करून वाढविण्यास चालना देणे, व्यवसाय आराखडा बनवणे, उद्योग स्थापन करून चालविणे बाजारपेठेशी जोडणी करणे इत्यादी आता या केंद्राच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

सदर उद्घाटन प्रसंगी श्री. राजू परसावार, माया सुमटकर, जयश्री कामडी, वसीम काझी, श्री. जीवनकर, श्री. तुराणकर, श्री. बोरकर, श्री. रंगारी इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)
Videos Photos